शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी विद्यालयाला पुनरुज्जीवन

By admin | Updated: July 30, 2015 00:13 IST

एकेकाळी कोकणचे वैभव म्हणून रायगड सैनिकी विद्यालयाची ओळख होती. मात्र विश्वस्तांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला बळी पडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हे विद्यालय बंद आहे.

महाड : एकेकाळी कोकणचे वैभव म्हणून रायगड सैनिकी विद्यालयाची ओळख होती. मात्र विश्वस्तांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराला बळी पडल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हे विद्यालय बंद आहे. तालुक्यातील आचकोली येथील रायगड सैनिकी विद्यालयाच्या पुनरुज्जीवनासाठी आता विद्यालयाचे माजी विद्यार्थी सरसावले आहेत. त्यांनी शहरातील बाजारपेठेतून आचकोली येथील विद्यालयापर्यंत दिंडी काढून संस्थेच्या विश्वस्तांच्या गैरकारभाराचा निषेध केला. या दिंडीत विद्यालयाच्या सत्तर माजी विद्यार्थ्यांसह विद्यालयाचे कर्मचारी देखील सहभागी झाले होते.क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांनी कोकणातील तरुण सैन्यदलात वरिष्ठ अधिकारी व्हावेत, या उद्देशाने २५ वर्षांपूर्वी रायगड सैनिकी विद्यालय उभारले. अल्पावधीतच नावारुपास आलेल्या विद्यालयात संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तांनी सुरू केलेल्या मनमानीमुळे गेल्या पाच - सहा वर्षांपासून उतरती कळा लागली. पदाधिकारी विश्वस्तांमध्ये मतभेद, खरेदीतील गैरव्यवहार, देणग्या व परीक्षा शुल्कात भ्रष्टाचार तसेच गलथान व्यवस्थापनामुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाली आणि गेल्या दोन वर्षांपासून हे विद्यालय बंद करण्याची वेळ विश्वस्तांवर आली. विद्यालय बंद पडल्यामुळे क्रांतीसिंह यांचे स्वप्न भंग झाल्याचे आजच्या विद्यालयावर आलेली अवकळा पाहून स्पष्ट होत आहे. अचानक विद्यालय बंद पडल्याने सुमारे १२५ कर्मचाऱ्यांवर गेल्या दोन वर्षांपासून उपासमारीची वेळ आली आहे. रायगड सैनिकी विद्यालस पूर्ववत सुरू व्हावे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून नव्याने विद्यालय सुरू करावे, यासाठी हे माजी विद्यार्थी शिक्षणमंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेणार आहेत. वेळ पडल्यास स्वत: विद्यालय चालवण्यास तयार असल्याचेही माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. बाजापेठेतून काढण्यात आलेल्या दिंडीचा समारोप सैनिकी विद्यालयात करण्यात आला. या दिंडीत सुशांत पोळ, अमित ठाकूर, चिराग दळवी, वैभव गोडबोले, वैभवी मिरकुटे, रत्नाली कलगुटकर आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)विश्वस्तांची मनमानी कारणीभूतअल्पावधीतच नावारुपास आलेल्या विद्यालयात संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तांनी सुरू केलेल्या मनमानीमुळे गेल्या पाच - सहा वर्षांपासून उतरती कळा लागली. पदाधिकारी विश्वस्तांमध्ये मतभेद, खरेदीतील गैरव्यवहार, देणग्या व परीक्षा शुल्कात भ्रष्टाचारामुळे विद्यार्थी संख्येत लक्षणीय घट झाली.माजी विद्यार्थी विद्यालय चालविण्यास तयाररायगड सैनिकी विद्यालस पूर्ववत सुरू व्हावे यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून विश्वस्त मंडळ बरखास्त करून नव्याने विद्यालय सुरू करावे, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे व रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेणार आहेत. वेळ पडल्यास स्वत: विद्यालय चालवण्यास तयार असल्याचेही माजी विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.