शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

माणगावच्या समर्थ नगरचे रहिवासी सांडपाण्याने त्रस्त

By admin | Updated: May 12, 2017 01:52 IST

शहरात सध्या सांडपाण्याचा प्रश्न गाजतो आहे. काळ नदी ही तर दूषित झाली असून बिल्डर लॉबीने आपली पोळी भाजून घेण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : शहरात सध्या सांडपाण्याचा प्रश्न गाजतो आहे. काळ नदी ही तर दूषित झाली असून बिल्डर लॉबीने आपली पोळी भाजून घेण्यासाठी ग्रामस्थांना वेठीस धरल्याचे चित्र माणगावात पहाण्यास मिळत आहे. शहरातील समर्थनगर येथील एका बिल्डरने आपल्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी अतिक्रमण करून जवळच्या ग्रामस्थांच्या मालकी जागेत सोडल्याने या नगरातील ग्रामस्थांनी नगरपंचायत माणगावकडे तक्रार केली असून नगरपंचायत प्रशासनाने अद्याप या बिल्डरवर कोणतीही कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी नगरपंचायतीवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.माणगाव नगरपंचायत हद्दीतील तहसीलदार कार्यालयाजवळील समर्थनगर या ठिकाणी कदम नावाच्या बिल्डरने गृहप्रकल्प उभारले असून या गृहप्रकल्प इमारतीत ३० ते ३२ कु टुंबेरहात आहे. या सर्व कु टुंबांचे सांडपाणी गटाराद्वारे पाइप लावून शेतातील ग्रामस्थांच्या जागेत सोडण्यात आल्याने हे ग्रामस्थ या सांडपाण्याला दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. याबाबतीत समर्थनगरातील रहिवाशांनी नगरपंचायत माणगाव यांच्याकडे सुरु वातीस ७ एप्रिल २०१७ रोजी तक्र ार अर्ज केला होता. त्यानंतर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्या समवेत समर्थ नगरातील रहिवाशांची चर्चा झाली. त्यावेळी माणगाव नगरपंचायतीने कारवाईचे संकेत दिले होते, परंतु याबाबतीत कोणतीच कारवाई न झाल्याने समर्थ नगरातील ग्रामस्थ, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश धर्मा तळकर, प्रफुल्ल कुलकर्णी, विजयमाला आचार्य, महेंद्र पवार, दत्ताराम चाळके यांनी लेखी पत्राद्वारे सांगितले आहे.ही समस्या अधिक बिकट होऊ लागल्याने पुन्हा एकदा समर्थ नगरातील ग्रामस्थांनी माणगाव नगरपंचायतीकडे १७ एप्रिल २०१७ रोजी तक्र ार अर्ज दिला आहे. यावर कारवाई होणे अपेक्षीत आहे.