पावसाचा जोर कमी
By Admin | Updated: August 1, 2015 23:35 IST2015-08-01T23:35:14+5:302015-08-01T23:35:14+5:30
रायगड जिल्ह्यात सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या काही भागात ३ आॅगस्ट सकाळपासून पुढील ७२ तासांत अतिवृष्टी

पावसाचा जोर कमी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याच्या काही भागात ३ आॅगस्ट सकाळपासून पुढील ७२ तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. या क्षेत्रातील काही भागात ७० मिमी ते १२० मिमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे २३.८० मि.मि., माथेरान येथे २१ मि.मि., पनवेल येथे १८ मि.मि., सुधागड-पाली येथे १७ मि.मि., पोलादपूर येथे १६ मि.मि., माणगांव येथे १२ मि.मि., अलिबाग येथे १० मि.मि., पेण, तळा व महाड येथे ९ मि.मि., रोहा येथे ६ मि.मि., कर्जत येथे ५ मि.मि., खालापूर येथे ३ मि.मि., मुरु ड येथे २ मि.मि. तर उरण येथे केवळ १ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. १ आॅगस्टपर्यंत पडलेला जिल्ह्यातील सरासरी पाऊस १४२२.१६ मि.मी. आहे.