शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

...तर आरसीएफ प्रकल्पही दुसऱ्या राज्यात, जनसुनावणीची सुनील तटकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:21 IST

अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात तटकरे यांची पत्रकार परिषद झाली. जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक यावेळी उपस्थित होते.

अलिबाग : राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प इतर राज्यांत जात आहेत. अलिबाग तालुक्यात आरसीएफ विस्तारित प्रकल्प आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या दोन्ही प्रकल्पांबाबत जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आरसीएफ कंपनीच्या नव्या प्रकल्पाची जनसुनावणी विशिष्ट कालावधीत घेतली गेली नाही, तर हा प्रकल्प इतर राज्यात जाण्याची शक्यता खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत  शुक्रवारी व्यक्त केली. 

अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात तटकरे यांची पत्रकार परिषद झाली. जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक यावेळी उपस्थित होते. आरसीएफ कंपनीमध्ये ९१२ कोटी गुंतवणूक असलेला नवा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामार्फत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली ठेवली होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, असे कारण देऊन जिल्हाधिकारी यांनी जनसुनावणी रद्द केली. मात्र विशिष्ट कालावधीत ही जनसुनावणी झाली नाही, तर येणारा प्रकल्प रद्द होईल, असे आरसीएफचे सीएमडी यांनी सांगितले असल्याची माहिती तटकरे यांनी यावेळी दिली. त्यामुळे हा प्रकल्प इतर राज्यात असणाऱ्या आरसीएफ कंपनीत जाण्याची दाट शक्यता त्यांनी यावेळी बोलून दाखवली. 

आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्नही प्रलंबित आहे. तो सुटणेही महत्त्वाचे आहे. मात्र जर जनसुनावणी विशिष्ट कालावधीत घेतली गेली नाही, तर प्रकल्पही नाही आणि नोकऱ्याही नाहीत, अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जनसुनावणी घेऊन अहवाल केंद्राकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडेही दुर्लक्ष-  एक तपानंतर जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन पहिली तुकडीही शिक्षण घेऊ लागली आहे. -  महाविकास आघाडी सरकारने साडेचारशे कोटी निधीही मंजूर करून प्रशासनाकडे दिला आहे. -  उसर येथे कामही सुरू झाले होते. -  मात्र, ग्रामस्थांचा वहिवाट रस्ता असल्याचे कारण देत काम बंद ठेवले आहे. -  ग्रामस्थांना पर्यायी किंवा त्यातून रस्ता द्यावा. -  पण, काम बंद करणे चुकीचे आहे. -  एमआयडीसीने महाविद्यालयासाठी मोफत जमीन दिली आहे. -  या वैद्यकीय महाविद्यालयामुळे परिसराचा विकास होणार आहे. -  तसेच उत्तम आरोग्य सुविधा मिळणार आहेत. -  असे असताना जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केला. 

 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस