शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

नागोठणेमध्ये बेकरीतील पावामध्ये उंदराची विष्ठा; प्रशासनाने घेतली तत्काळ दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 9:10 AM

दुपारी जेवणाचा डबा न आणल्याने त्यांनी जेवणासाठी एका हॉटेलमधून पावभाजी मागवली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागोठणे : नागोठणे शहरातील गुरव आळी भागातील किंग बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये चक्क उंदराची विष्ठा आढळून आल्याची घटना घडली.

सुधागड तालुक्यातील सचिन डोबले यांचा नागोठणे हायवे नाका येथे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या टायर विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी डोबले यांनी दुपारी जेवणाचा डबा न आणल्याने त्यांनी जेवणासाठी एका हॉटेलमधून पावभाजी मागवली. ते पावभाजी खाण्यास गेले त्यावेळेस पावात उंदराची विष्ठा आढळून आली. यावेळी डोबले हॉटेलमध्ये जाऊन याबाबत विचारणा केली असता, हॉटेलमालकाने पाव घेऊन येणाऱ्या फेरीवाल्यास तत्काळ बोलावून घेतले. त्यावेळी फेरीवाल्याने पाव किंग बेकरीतून आणल्याचे सांगितले.

याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात सचिन डोबले यांनी लेखी तक्रार दाखल केली. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पेण येथील कार्यालयात संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. यावेळी घटनेची तत्काळ दखल घेत अन्नसुरक्षा अधिकारी स. रा. आढाव, व्ही. एस. निकम व पाटील यांनी सायंकाळी नागोठणे येथे येऊन किंग बेकरीतील उत्पादन केलेल्या पाव लाद्यांची तसेच बेकरीची संपूर्ण तपासणी करून पाहणी केली.

उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देश

 यावेळी अधिकाऱ्यांना बेकरीत उंदरांनी कुरतडलेले पाव, आळी पडलेल्या काही पाव लाद्या, याचबरोबर बेकरीत काही ठिकाणी पडलेल्या उंदराच्या लेंड्या आढळून आल्या.  येथे उत्पादन केलेल्या पावांची प्रत्यक्ष पाहणी करून अन्नसुरक्षा अधिकारी यांनी किंग बेकरी मालकास उत्पादन बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भातील पत्र नागोठणे पोलिसांना संबंधित अधिकारी वर्गाकडून देण्यात आले आहे.