शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

रंग दे महाराष्ट्र अभियानाअंतर्गत रंगल्या शाळांच्या भिंती, जिल्हाधिकारी बनले चित्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 19:59 IST

मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे.

जयंत धुळप

रायगड - मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करता येवू शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरु किल्ली आहे , असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी (28 एप्रिल) माणगांव तालुक्यांतील मुठवली गावांतील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. यावेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकार्यांचे पथक उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या संवादाने भारावले ग्रामस्थ

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील निवडक गावातील कामांची पाहणी करु न ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने केली. सकाळी मुठवली ग्रामस्थांशी सर्व अधिकार्यांनी संवाद साधला,आणि ग्रामस्थ भारवून गेले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए.आर.देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाव करी ते राव न करी

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणार्या कुटूंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी व विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  गाव करी ते राव न करी अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणोच गावाने एकत्न येऊन ठरवावे,त्यांना हवा तो विकास ते करु  शकतात. त्यासाठी शासनाची यंत्रणा नेहमी त्यांना सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी आज केलेली मोठी गुंतवणूक ठरेल. गावकऱ्यांनी मिळून गावात नियमत स्वच्छता अभियान राबवावे,जेणे करु न स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल.

गावकरी आणि शासन एकत्र, विकासाचे नवे मॉडेल

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी  गावकऱ्यांनी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन  यांनी एकत्न येऊन तयार केलेले विकासाचे नवे मॉडेल ठरावे व त्याची सुरु वात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे , असे आवाहन केले.

आणि जिल्हाधिकारी बनले चित्रकार

ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. यावेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु  होते.  रंग दे महाराष्ट्र  या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील मुठवली येथील शाळेच्या भिंती आज रंगल्या. हे रंगकाम एरवीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे यासाठी या भिंतींवर शैक्षणकि चित्ने चितारण्यात आली. या अभियानात  स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते. दुपारनंतर या पथकाने सुधागड तालुक्यांतील महागाव व नवघर या गावातील कामांची पाहणी करु न ग्रामस्थांशी संवादही साधला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस