शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 11:34 PM

मुरुड तालुक्याला जवळपास अडीच किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

- गणेश चोडणेकर आगरदांडा : मुरुड तालुक्याला जवळपास अडीच किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. काशीद, किहीम, नायगाव, मुरुड या ठिकाणी दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक येत असले तरी किनारी भागात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना राबविण्यात न आल्याने पर्यटकांना जीव गमवावा लागत आहे.नारळ-पोकळीच्या बागा, विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुरुची वने आदीमुळे हा परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. किनारी भागात स्पीड बोट, बनाना बोट, पॅराशूट सफारीची सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी काळजी न घेतल्याने शनिवारी एका पर्यटकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. २०१४ मध्येही पुणे येथील अबिद इनामदार महाविद्यालयातील विद्यार्थी पाण्यात पोहण्यात उतरले व १४ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मुरुड येथील समुद्रकिनाºयावर टेहळणी मनोरे उभारण्यात आले. तर नगरपरिषदेकडून जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात आली; परंतु इतर कोणत्याही सुविधा येथे देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे किनारी भागात वारंवार दुर्घटना घडत आहे.मुरुडमध्ये ग्रामीण रुग्णालय असून मनुष्यबळाचा अभाव, अद्ययावत साधन सामग्री नसल्याने अपघात घडल्यास पर्यटकाला अलिबाग येथे हलवावे लागते. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते.तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठीही लाखो पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. त्यांची शिडाच्या बोटीतून वाहतूक केली जाते. मात्र, अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत घेतले जातात. या वेळी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजनांकडे लक्ष दिले जात नाही.>पॅराशूट सफरीचा व्यवसाय तेजीतमहाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसते. समुद्रात बेकायदा वाहन चालवून पॅराशूट सफरीचा व्यवसाय या ठिकाणी गेल्या चार- पाच वर्षात तेजीत आला आहे. यात पर्यटकांच्या सुरक्षेला बगल देण्यात येत असून बंदर निरीक्षकांकडूनही कारवाई होत नसल्याने हा व्यवसाय फोफावला आहे.समुद्रात सकाळी व संध्याकाळी वॉकिंगसाठी व फिरण्यासाठी खूप पर्यटक येतात. हे माहीत असून किनारी भागात मुरुड नगरपरिषदेने चारचाकी वाहनांना बंदी घातलेली नाही. शनिवारच्या घटनेनंतर पॅराशूट व्यवसाय करणाºयाबरोबरच संबंधित अधिकाºयांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.मुरुड समुद्रकिनारी स्पीडबोट, बनाना बोट, पॅराशूट रायडिंग केले जाते. हौशीखातर पर्यटक या सफरीचा आनंद घेत असले तरी अनेकदा तो त्यांच्या जीवावर बेततो. अद्ययावत रुग्णालय नसल्याने पर्यटकांना वेळेवर उपचारही मिळत नाही.>समुद्रात चालणाºया खेळासाठी आम्ही परवानगी देतो. मात्र, पाण्यात जाण्याआधी पर्यटकांना लाइफ जाकीट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच स्पोटर््स गेम्सचे लायसन्स घेणाºयांना सर्व बोटींवर एक उत्कृष्ट स्विमर नियुक्त करण्याचीही सक्ती केली आहे.- हितेंद्र बारापत्रे, बंदर निरीक्षक, मुरुड