शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 14:58 IST

महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती

रायगड/मुंबई - ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटुंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं, अशी माहिती देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. मी उद्या येतोय, म्हणत राज यांनी गुरुवारीच यासंदर्भात माहिती दिली होती. राज यांनी कुटुंबासमवेत रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले. तसेच, महाराष्ट्रातील जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी, त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतच्या आठवणी जागवल्या. 

महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेंव्हा मी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत जवळ जवळ रोज जायचो. त्यावेळेला संध्याकाळी रोज ७ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा व्हायचा. तो मी दररोज बघायचो आणि तो मला तोंडपाठ झाला होता. तो क्षण होता की छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं, भारावलं, जे अजून ही तसंच आहे आणि आयुष्यभर हे मंतरलेपण राहील, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.  

मी अनेकदा रायगडावर गेलो आहे. प्रत्येकवेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं, ते विलक्षण होतं, असेही राज यांनी म्हटले. मी नेहमी म्हणतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हा सामान्यांनी घडविलेला असामान्य इतिहास आहे. मी काल म्हणलं तसं ते एक युगप्रवर्तनच होतं. आणि शिवराज्याभिषेक हा त्या युगप्रवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा होता. ह्या हिंद भूमीच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी या रयतेच्या राजाला राजसिंहासनाची, राज्याभिषेकाची नितांत गरज होती...  हा सुवर्णक्षण पुढची अगणित वर्ष ह्या हिंद भूमीला प्रेरणा देत राहील इतकी ताकद ह्या घटनेत आहे, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मनामनात घुमू दे आणि त्यांचे विचार आपल्या मराठी जनांच्या धमण्यामंधून वाहू देत, हीच इच्छा आणि हीच आजच्या दिवशी शिवचरणी प्रार्थना, राज ठाकरेंनी केली आहे. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे