पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले; 130 मीमी पावसाची नोंद
By वैभव गायकर | Updated: September 16, 2022 17:04 IST2022-09-16T17:04:06+5:302022-09-16T17:04:18+5:30
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता

पनवेल तालुक्याला पावसाने झोडपले; 130 मीमी पावसाची नोंद
लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल:पनवेल तालुक्याला गुरुवारी मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने चांगलाच झोडपाल्याचे चित्र पहावयास मिळाले.शुक्रवार दि.16 रोजी पावसाची संततधार दिवसभर सुरु असल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने पहावयास मिळाले.
पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.पनवेल मध्ये भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पिके सुरळीत वाढत असताना पावसाचा जोरदार तडका पनवेलमध्ये बसत असल्याने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता पळस्पे येथील शेतकरी चंद्रकांत भगत यांनी व्यक्त केली.पनवेल मधील गाढी आणि कासाडी या दोन्ही नद्यांनी धोका पातळी ओलांडली नसली तरी दोन्ही नद्या दुथडी वाहत होत्या.पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.जोरादार पावसामुळे पांडवकडा धबधवा,आदई धबधवा तसेच गाडेश्वर डॅम ओसंडून वाहत आहे.