Raigad: उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:21 IST2023-07-21T16:18:28+5:302023-07-21T16:21:03+5:30
Raigad: उरण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विशाल राजवाडे (४४) यांचे गुरुवारी हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मुंबईतील रुग्णालयात अकस्मात निधन झाले आहे.

Raigad: उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन
- मधुकर ठाकूर
उरण - उरण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विशाल राजवाडे (४४) यांचे गुरुवारी हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मुंबईतील रुग्णालयात अकस्मात निधन झाले आहे.
विशाल राजवाडे हे बुधवारी चिरनेर येथील पुरग्रस्तांच्या मदतकार्यात रात्रभर सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांचे कुटुंबीय वरळी येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान त्यांना हदयविकाराचा झटका आला.त्यातच त्यांचे अकस्मात दुदैवी दुःखद निधन झाले.
कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याच्या अकस्मात निधनाने पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांमधुन हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,आठ वर्षांचा मुलगा,तीन वर्षांची मुलगी असे कुटुंब आहे.