रायगडमध्ये खबरदारी घेतल्यानेच यंत्रणा सुदृढ; कोरोना वॉरियर्सचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 01:04 AM2020-05-29T01:04:27+5:302020-05-29T01:04:52+5:30

पोलीस, आरोग्य, महसूल विभागात शिरकाव नाही

In Raigad, the system is strengthened only by taking precautions; Corona Warriors success: | रायगडमध्ये खबरदारी घेतल्यानेच यंत्रणा सुदृढ; कोरोना वॉरियर्सचे यश

रायगडमध्ये खबरदारी घेतल्यानेच यंत्रणा सुदृढ; कोरोना वॉरियर्सचे यश

googlenewsNext

- आविष्कार देसार्ई 

अलिबाग : आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासन अगदी फ्रंटवर उभे राहून कोरोनाचा मुकाबला करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. मात्र या यंत्रणेतील योद्ध्यांना कोरोनाने मोठ्या संख्येने टार्गेट केलेले नाही. अपवाद फक्त महाड सरकारी रुग्णालयातील एका परिचारिकेचा आहे. सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतल्यानेच कोरोना वॉरियर्स कोरोनापासून बचाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी हे आपला जिल्हा कोरोनापासून सुरक्षित राहावा यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा थेट संबंध हा कोरोनाबाधित रुग्णांशी येत आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या पोलिसांनासुद्धा अद्याप कोरोनाने शिवलेलेदेखील नाही.

रायगड जिल्ह्यातील चेकपोस्टवरुन अद्यापर्यंत अडीच लाख चाकरमानी नागरिक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९०० हून अधिक कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत, तर ३७ रुग्ण कोरोनाविरोधातील लढाई हरले आहेत. मृत पावलेले रुग्ण हे अन्य कोणत्या आजाराने त्रस्त असल्याने सहजपणे कोरोनाच्या मगरमिठीत अडकले.

ग्रामीण भागांमध्येदेखील आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी हेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करताना त्यांच्या संपर्कात आले आहेत. मात्र त्यांनी योग्य ती खबरदारी घेतल्यानेच त्यांना कोरोनाची बाधा पोहोचलेली नाही. जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी हेदेखील कोरोनाविरोधातील लढाईत मागे राहिलेले नाहीत. त्यांनाही अद्याप कोरोना झाल्याचे आढळले नाही.

सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे - निधी चौधरी

कोरोनाविरोधातील लढाई लढताना सेनाप्रमुख आणि सैन्य सक्षम असणे महत्त्वाचे आहे. हाच धागा पकडून रायगड जिल्ह्यात कोरोनाविरोधातील लढाई प्रशासकीय यंत्रणा लढताना दिसून येते. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे याबाबत सर्वच यंत्रणांनी सक्षम असणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याने तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या होत्या, असे जिल्हाधिरी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा मुकाबला करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, त्याचबरोबर ती सरकार आणि प्रशासनाचीही आहे. नागरिकांची काळजी घेताना पोलीस, आरोग्य आणि महसूल, जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोरोनापासून सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यामुळे जनतेची काळजी घेताना प्रथम आपली काळजी घेण्याबाबत आधीपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या. लवकरच या संकटातून आपण बाहेर पडू.
- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड

Web Title: In Raigad, the system is strengthened only by taking precautions; Corona Warriors success:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.