Raigad : उरण येथील कबड्डीपटू किशोर पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 18:15 IST2022-12-25T18:14:42+5:302022-12-25T18:15:08+5:30
Raigad : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील ज्येष्ठ कबड्डीपटू किशोर गजानन पाटील यांना रविवारी राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Raigad : उरण येथील कबड्डीपटू किशोर पाटील यांना राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार
- मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील ज्येष्ठ कबड्डीपटू किशोर गजानन पाटील यांना रविवारी राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आगरी साहित्य संमेलन भरले आहे. या संमेलनात राज्याचे माजी मंत्री व माजी खासदार जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा आगरी विकास मंडळा कडून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा गुणगौरव पुरस्कार आहे. मंडळाचे अध्यक्ष मोहन भोईर, पुंडलिक म्हात्रे, ॲड. पी. सी. पाटील व संमेलनाच्या अध्यक्षा दमयंती भोईर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. किशोर गजानन पाटील हे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध गणेश क्लब या संघाचा खेळाडू आहे. या खेळाचा वारसा त्यांना त्यांचे वडील गजानन बळीराम पाटील यांच्या कडून मिळाली आहे. त्यांनी जेएनपीटी या बंदरातील कबड्डी संघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं आहे. जेएनपीटीचा एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून देशात नाव कमावले आहे. तसेच बोकडविरा गावातील गणेश क्लब या संघाच्या खेळाडूंना घडविण्यात त्यांचा वाटा आहे. त्यांचे हे काम आजही सुरूच आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रो कबड्डी मध्ये निवड झालेल्या मुयर कदम या गणेश क्लबच्या खेळाडूला घडविण्यात त्यांनी पुढाकार घेतला.अशा अनेक कबड्डी पट्टूना मेहनतीने व पदरमोड करून घडविणाऱ्या किशोर पाटील यांना क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.