Raigad: जसखारमध्ये चारचाकी भस्मसात, शॉर्ट सर्किट की घातपात? पोलिसांकडून कसून तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:33 IST2023-01-05T20:32:24+5:302023-01-05T20:33:02+5:30
Raigad News: उरण तालुक्यातील जसखार येथील आगरी कोळी समाजातील नामवंत कलाकार व "आई तुझं देऊळ "फेम सचिन ठाकूर यांची चारचाकी गाडी बुधवारी (४) रात्री काही गावगुंडानी आग लाऊन जाळली आहे.

Raigad: जसखारमध्ये चारचाकी भस्मसात, शॉर्ट सर्किट की घातपात? पोलिसांकडून कसून तपास
- मधुकर ठाकूर
उरण - उरण तालुक्यातील जसखार येथील आगरी कोळी समाजातील नामवंत कलाकार व "आई तुझं देऊळ "फेम सचिन ठाकूर यांची चारचाकी गाडी बुधवारी (४) रात्री काही गावगुंडानी आग लाऊन जाळली आहे.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात असुन या प्रकरणी न्हावा-शेवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सचिन ठाकूर यांनी त्यांची चारचाकी घराजवळ उभी होती. बुधवारी (४) रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी पेटवून जाळण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर सीएनजी गाडीच्या शेजारीच आणखी तीन ऑटोरिक्षा उभ्या होत्या. या चारही सीएनजी गाड्यांनी पेट घेतला असता आजूबाजूची घरेही पेटून जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असते.मात्र सुदैवाने शेजाऱ्यांनी आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर न्हावा -शेवा बंदर शार्टसर्किट की इतर कारणांमुळे घटना घडली याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.