शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 1:38 AM

पावसाने रविवारीही खोपोली, खालापूर, महाड, अलिबाग, पेण, उरण, नागोठणे परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यातच, सकाळच्या सुमारास पावसात कोसळलेल्या झाडामुळे विजेच्या ताराही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

अलिबाग : तब्बल २५ दिवस उशिराने सुरू झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले असून, सरासरी ८०.६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात रायगडमध्ये सुमारे १४९.८४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सध्या तर भातशेती लावण्यासाठी पुरेसा पाऊस झाला असला, तरी शनिवारी सकाळपासूनच जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आता तिहेरी संकटात अडकला आहे. जूनच्या पहिल्या आठवडा अखेरपर्यंत पावसाला सुरुवात होते, परंतु यंदा निसर्ग चक्रीवादळानंतर २५ दिवस उशिराने पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने श्रीवर्धन येथे सर्वाधिक २३४ मिमी नोंद झाली आहे. त्या खालोखाल म्हसळा २१५ मिमी, तर सर्वात कमी महाड ६६ मिमी पावसाची नोंद करण्यात झाली आहे.पावसाने रविवारीही खोपोली, खालापूर, महाड, अलिबाग, पेण, उरण, नागोठणे परिसरात जोरदार हजेरी लावली होती. त्यातच, सकाळच्या सुमारास पावसात कोसळलेल्या झाडामुळे विजेच्या ताराही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, काही काळाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, झालेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली.नवी मुंबईत चोवीस तासांत २३० मिमीनवी मुंबई : शुक्रवारपासून पावसाचे जोरदार अगमन झाले. सलग तिसºया दिवशी रविवारी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे हा पाऊस लॉकडाऊनच्या पथ्यावर पडला. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडून लॉकडाऊनचे नियम मोडणाºयांना चाप बसल्याचे दिसून आले.नवी मुंबईत गेल्या २४ तासांत सरासरी २३० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तर रविवारी वृक्ष कोसळण्याच्या सात घटना घडल्या आहेत. शहरातील काही सखल भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या, परंतु महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने तातडीने कार्यवाही करीत पाण्याला प्रवाह करून दिला. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईत शनिवारपासून लॉकडाऊन घोषित के ला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. भाजीपाला, दूध, औषधे व किराणा विक्रीच्या दुकानांनाही मर्यादित वेळ देण्यात आली आहे, पावसामुळे नागरिकांना निर्धारित वेळेत खरेदीसाठी बाहेर पडता आले नाही.रोहा तालुक्यात मुसळधारधाटाव : गेली अनेक दिवस आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी राजाचा चेहरा मान्सून धो धो बरसल्याने आनंदित झाला आहे. तर पावसाच्या दमदार सुरुवातीने लावणीच्या कामाला आता वेग आला असून, शेतकरी राजाची चिंता मिटल्याचे दिसून येत आहे.या वर्षी मान्सून वेळेवर सुरू होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु लावणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती, त्यामुळे जून महिना कोरडाच गेला. रोपे सुकण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर गेली दोन दिवस पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. कोरोना काळात व्यापार-उद्योग बंद आहेत. हाताला काम नाही, असे असताना अनेकांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे रोह्यात शेती बहरणार आहे. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकºयाला अपेक्षा आहे. शेतकरी नवीन विकसित बियाण्यांचा वापर करीत असल्याने तांदूळही चांगल्या प्रतिचा मिळत आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर भातशेतीला पुन्हा एकदा महत्त्व आले आहे. यामध्ये कृषी खात्याचे मार्गदर्शन मिळत आहे.नदीचे पाणी रस्त्यावर; कार्लेचा संपर्क तुटलाबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यामध्ये गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. सर्व परिसर पूर्णत: जलमय झाला असून, भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. संततधार पावसाने बोर्लीपंचतन दिघी मार्गावर शिस्ते गावाजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीस रात्रीच्या सुमारास बंद करण्यात आला होता. कार्ले नदी दुथडी भरून वाहू लागल्याने कार्ले गावाचा संपर्क तुटला होता.मागील पाच दिवस पावसाची संततधार चालू राहिल्याने बोर्लीपंचतन परिसरामध्ये पावसाने चांगलीच दाणादाण उडाली, तर कार्ले, कुडकी, रानवली लघू पाटबंधारे धरणातील जलसाठ्यामध्ये चांगली वाढ झाली. बोर्लीपंचतन गावाला सहा महिने पाणीपुरवठा करणारे कोंढेपंचतन धरण पूर्ण भरून वाहू लागले.श्रीवर्धन-बोर्ली मार्गावरील कार्ले गावाकडे जाणारी नदी पावसामध्ये दुथडी भरून वाहत होती. या नदीमध्ये प्रचंड गाळ असल्याने कार्ले गावाकडे जाण्यासाठी असलेला पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे गावातील नागरिकांना मुख्य बाजारपेठ, अत्यावश्यक वैद्यकीय उपचारासाठीही जाता येत नसल्याने, मोठी गैरसोय कार्ले गावातील नागरिकांची होत आहे. हि परिस्थिती दर पावसाळ्यात असते.६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यताशुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचले होते. अचानक पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. भातलावणीचे काम सुरू असतानाच पाऊस आल्याने बळीराजा सुखावला होता. येत्या ६ जुलैपर्यंत अशाच मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमारांनाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई