शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?
2
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
3
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
4
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
5
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
6
Anna Hazare : अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही"
7
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
8
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
9
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
10
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
11
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
12
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
13
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
14
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"
15
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!
16
निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..."
17
"हॅलो फ्रॉम Melodi टीम", जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...
18
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे 'मेलोडी टीम...' सोशल मीडियावर ट्रेंड; PM मोदींनी दिली अशी रिअ‍ॅक्शन
19
दादा कोंडके यांचं झालं होतं लग्न, पण ४ वर्षांतच मोडला घटस्फोट; कोण होती ती?
20
“भुजबळ वैफल्यग्रस्त, दिल्लीत जायची संधी हुकल्याने राज ठाकरेंवर बोलले”; मनसेचा पलटवार

Raigad: अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात, यंदा उत्पादन वाढले, व्यापाऱ्यांच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे 

By राजेश भोस्तेकर | Published: February 05, 2024 12:11 PM

Raigad white onion: अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीस दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपये कांदा माळ विक्री केली जात आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक हे आवर्जून कांदा खरेदी करीत आहे.

- राजेश भोस्तेकर अलिबाग - अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीस दुकाने सजली आहेत. दीडशे ते अडीचशे रुपये कांदा माळ विक्री केली जात आहे. अलिबागमध्ये आलेले पर्यटक हे आवर्जून कांदा खरेदी करीत आहे. यंदा उत्पादन गतवर्षी पेक्षा अधिक झाल्याने व्यापारी वर्गाने सध्या पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना कांद्याचा भाव कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लिबाग तालुक्यातील कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावात पांढरा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबाग मधील २५० हेक्टर वर कांदा लागवड केली जाते. यंदा अवेळी पाऊस पडल्याने कांदा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र तशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. यावेळी तालुक्यात पांढरा कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.

अलिबागचा कांदा खरेदीसाठी व्यापारी वर्ग हा काढणी आधी शेतकऱ्याकडे येत असतो. गतवर्षी मणाला १४०० रुपये दर व्यापारी यांच्याकडून देण्यात आला होता. यावेळी आठशे ते अकराशे दर दिला जात आहे. मात्र उत्पादन अधिक वाढले असल्याने व्यापारी वर्गाने सध्या पाठ फिरवली आहे. भाव कमी होईल या आशेने व्यापारी आलेले नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापारी येण्याकडे डोळे लागले.

व्यापारी वर्ग अद्याप आले नसल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर आपले दुकान थाटले आहे. त्यामुळे अलिबाग वडखळ मार्गावर सध्या कांदा विक्रीस दिसू लागला आहे. छोट्या कांद्याची माळ दीडशे तर मोठी माळ अडीचशे रुपये दराने मिळत आहे. अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने येणारे पर्यटक आवर्जून माघारी निघताना पांढरा कांदा खरेदी करीत आहेत. व्यापारी आले नसले तरी शेतकऱ्यांचा माल हा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पांढरा कांद्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे.

टॅग्स :onionकांदाRaigadरायगडFarmerशेतकरी