उरण परिसरात नागरी वस्त्यांमध्ये वाढले अजगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:49 AM2020-08-09T00:49:37+5:302020-08-09T00:49:40+5:30

- मधुकर ठाकूर उरण : उरण परिसरात ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये या आधी क्वचितच आढळून येणारे भलेमोठे अजगर मोठ्या संख्येने ...

Pythons grew up in urban areas in the Uran area | उरण परिसरात नागरी वस्त्यांमध्ये वाढले अजगर

उरण परिसरात नागरी वस्त्यांमध्ये वाढले अजगर

Next

- मधुकर ठाकूर

उरण : उरण परिसरात ठिकठिकाणच्या नागरी वस्त्यांमध्ये या आधी क्वचितच आढळून येणारे भलेमोठे अजगर मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. यामध्ये सर्वत्रच आढळून येणाऱ्या इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगरांची संख्या सर्वाधिक आहे.

मागील दोन महिन्यांत तर भक्ष्यासाठी उरण परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये आलेल्या सुमारे ४५ ते ५० अजगर सर्पमित्रांनी पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक आवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहेत.

उरण परिसरात औद्योगिक पसारा वाढतच चालला आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि विकासाच्या नावाखाली डोंगरदºया, टेकड्या बुलडोझर फिरवून नष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील वनसंपदा नष्ट झाली आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे नैसर्गिक हिरवळही सिमेंट काँक्रिटच्या वाढत्या जंगलात हरवून गेली आहे. परिणामी, वन्यजीवांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. या आधी नागरी वस्त्यांमध्ये पक्षी आणि विविध प्रकारचे साप आणि अन्य सरपटणारे प्राणी आढळून येत होते. त्यामध्ये आता भल्यामोठ्या अजगरांची भर पडली आहे.

इंडियन रॉक पायथॉन अधिक
मागील दोन महिन्यांत उरण परिसरातील विविध ठिकाणांहून सुमारे ४५ ते ५० अजगर सापडले आहेत. यामध्ये चार ते १४ फूट लहान-मोठ्या आकार आणि लांबीच्या अजगरांचा समावेश आहे.५ ते २५ किलो वजनाचे अजगर बकºया, कुत्री, मांजरे, उंदीर, कोंबड्या खाण्यासाठी नागरी वस्त्यांमध्ये येतात. असे अजगर कधी कोंबड्यांच्या खुराड्यात कधी बकऱ्यांच्या गोठ्यात दिसतात. काही वेळा तर कंटेनर मालाच्या गोदामातही भलेमोठे अजगर आढळून आले आहेत. यामध्ये सर्वत्रच आढळून येणाºया इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगरांची संख्या सर्वाधिक आहे.

सध्या डोंगर, जंगल परिसरात यांत्रिक आवाजाची धडधड वाढली आहे. त्यातच जंगलात भक्ष्याची चणचण भासत आहे. मागील दोन महिन्यांत मानवी वस्तीत आलेल्या १६ बेबी पायथॉन तर ९ मोठे अजगर पकडून जंगलात सोडून दिले आहेत.
- आनंद मढवी,
सर्पमित्र, उरण.

वन्यजीवांच्या आश्रय स्थानावरच मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळेच अजगरांसारखे दुर्मीळ जीव भक्ष्यासाठी आता नागरी वस्त्यांमध्ये आढळून येऊ लागले आहेत. चिरनेर, रानसई, आक्कादेवी आदी परिसरांतूनच मागील दोन महिन्यांत तब्बल १२ अजगर पकडले आहेत. यामध्ये ४ ते १२ फुटी लांब आणि १० ते २५ किलो वजनाच्या अजगरांचा समावेश आहे.
- विवेक केणी, अध्यक्ष वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था, उरण

Web Title: Pythons grew up in urban areas in the Uran area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.