साार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:20 IST2019-07-17T00:20:29+5:302019-07-17T00:20:36+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजाची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली

साार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजाची पाहणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असून पोलादपूर येथे दिलेल्या खासगी भेटीनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत चालू असलेल्या बोगद्याची पाहणी करून कामकाजाबाबत माहिती घेतली. बांधकामाची गती वाढवून डिसेंबर २०१९ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिका वाहतूक सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना कंत्राटदारांना व महामार्ग अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. तसेच महामार्गाचे काम २०२० पर्र्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दोन दिवस चंद्रकांत पाटील यांनी रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. त्यानंतर कंत्राटदारांच्या काही ठिकाणी अवलंबलेल्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाच्या कामाची अधिकाऱ्यांनी जातीने देखरेख करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात उभारण्यात येणाºया वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याच्या कामाचीही पाहणी केली. बांधकामाची कामाची गती वाढवून डिसेंबर २०१९ पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिका वाहतूक सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी अशा सूचना कंत्राटदारांना व महामार्ग अधिकाºयांना केल्या. चौपदरीकरणाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देशही दिले. गणेशोत्सवात कोकणात येणाºया चाकरमान्यांचा या महामार्गावरून प्रवास सुखकर होईल, याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेशही संबंधित अधिकाºयांना त्यांनी या वेळी दिले.
>प्रवास होणार जलद व सुरक्षित
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटातील धोकादायक वळणांमुळे अपघाताच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि चाकरमान्यांचा प्रवास कमी वेळात, सुरक्षित करण्यासाठी १.८० आणि १.९० किमीचे दोन बोगदे बनविण्याचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. कशेडी बोगद्याचे १५० मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम विहित मुदतीत पूर्ण करण्यात येईल, मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर, २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.