प्रांताधिकाऱ्यांची कर्जतच्या बाल उपचार केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:02 IST2019-09-26T23:02:41+5:302019-09-26T23:02:48+5:30
मुलांना, पालकांना मार्गदर्शन; पोषण, स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना सूचना

प्रांताधिकाऱ्यांची कर्जतच्या बाल उपचार केंद्राला भेट
कर्जत : तालुक्यातील कुपोषणाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शासनाच्या आरोग्य व महिला बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या बाल उपचार केंद्रास कर्जतच्या प्रांताधिकारी यांच्यासह इतर शासकीय अधिकाºयांनी भेट देत वार्डामधील स्वच्छता व पोषणाबाबत सूचना दिल्या.
कर्जत येथील दिशा केंद्राच्या पोषण हक्क गटाच्या वतीने जिल्हा तसेच राज्यस्तरावर केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर व रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डीपीडीसीमधून मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित मुलांसाठी बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या बाल उपचार केंद्रात एकूण १३ तीव्र कुपोषित मुले उपचार व पोषण सेवा घेत आहेत. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या केंद्रास समाजातील सर्वस्तरातील नागरिकांनी, शासकीय अधिकाºयांनी भेटी देत मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले आहे. २५ सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला आहीरराव, कर्जत-खालापूरच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे, संदीप पाटील आदीनी भेट देत मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले.
प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छता, आहार पुरवणाºया कर्मचाºयांना आहाराबाबत सूचना केल्या. मुलांच्या वजनवाढीबाबतची व मुलांची मेडिकल ग्रोथ कशी, याबाबतची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांच्याकडून घेतली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेत या बाबत मार्गदर्शन केले.
बाल उपचार केंद्रासाठी आवश्यक तो निधी या पुढेही उपलब्ध करून दिला जाईल, याबाबत आश्वासित केले, तसेच तालुक्यात सुरू असलेल्या एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचाही निधी वेळेवर मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
- शशिकला आहीरराव, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार हे बाल उपचार केंद्र सुरू असून या केंद्रामधून बरे होऊन परत घरी गेलेल्या मुलांचाही पाठपुरावा करून त्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी दिशा केंद्राच्या मदतीने व मोहीम स्वरूपात हे काम नियमित ठेवण्याचे नियोजन आहे. आरोग्य व बालविकास विभागासह सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने कु पोषणाची तीव्रता कमी करण्याचे नियोजन आहे.
- वैशाली ठाकूर, rai
प्रांताधिकारी, कर्जत