शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने; रायगड, नवी मुंबईत आंदोलने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:24 AM

कर्नाटक येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. रायगड जिल्ह्यातही शिवसेनेने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.

कर्नाटक येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. रायगड जिल्ह्यातही शिवसेनेने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.ए.येडियुरप्पा यांच्या निषेधार्थ घोषणा देत, कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुन्हा पुतळ्याची त्याच ठिकाणी स्थापना करण्याची मागणी करण्यात आली, तर नवी मुंबई शहरातही काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध क रण्यात आला.अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन; जोरदार घोषणाबाजीअलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ रविवारी अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे शहरात कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कर्नाटकमधील बेळगाव येथील एका ग्रामपंचायतीने बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने तातडीने हटविला. कर्नाटक सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी अलिबाग तालुका शिवसेनेने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रविवारी दुपारी बारा वाजता निषेधार्थ निदर्शने केली. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवून महाराजांचा अपमान केला आहे. पक्षाचा आदेश आल्यास अलिबाग तालुक्यातील शिवसैनिक कर्नाटक येथे जाऊन आंदोलन करतील.कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने त्या जागी पुन्हा बसवावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केली. उपस्थित शिवसैनिकांनी यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.आंदोलनाच्या वेळी पोलीस बंदोबस्तकर्नाटक सरकारने देशाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून पाप केले आहे. त्याचा अलिबाग तालुका शिवसेना जाहीर निषेध करीत आहे. पक्षाचा आदेश आल्यास अलिबाग तालुक्यातील शिवसैनिक कर्नाटकात जातील, असा इशारा तालुकाप्रमुख राजा केणी यांनी यावेळी दिला. आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.प्रतीकात्मक पुतळ्याला मारले जोेडेउरण : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील माणगुती गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविल्याने, संतप्त झालेल्या उरण शिवसेनेच्या वतीने रविवारी (९) कर्नाटक सरकारच्या प्रतिकृती असलेल्या पुतळ्याला जोडे मारून जाहीर निषेध केला.शिवसेना उरण शहर शाखेजवळ उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या निषेध कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी भाजपच्या कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवडणुकीत मते मागण्यासाठी व सरकार स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा व नंतर त्यांचा अपमान करायचा, या भाजप नीतीचा उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी जाहीरपणे निषेध केला. यावेळी शिवसैनिक सोशल डिस्टन्सचे पालन करीत सहभागी झाले होते.मुरुडमध्ये शिवभक्तांनी पुतळा जाळून केला निषेधआगरदांडा : कर्नाटक येथील मनगुत्ती गावात नागरिकांनी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटविण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळल्याने, रविवारी सकाळी मुरुड तालुक्यातील शिवसेना कार्यकत्यांनी मुरुड बाजारपेठ नाक्यावर येऊन कर्नाटक सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘कर्नाटक भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ, शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, शहरप्रमुख आशील ठाकूर, उपशहर प्रमुख विजय वाणी, नगरसेवक प्रमोद भायदे, नगरसेवक पाडुरंग आरेकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.