रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 173 पोलीस अंमलदारांना पदोन्नती 

By निखिल म्हात्रे | Updated: October 28, 2023 14:28 IST2023-10-28T14:27:55+5:302023-10-28T14:28:16+5:30

याबाबतचे आदेश 27 आॅक्टोबर निर्गमित करण्यात आले आहेत.

Promotion of 173 Police Officers in raigad | रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 173 पोलीस अंमलदारांना पदोन्नती 

रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 173 पोलीस अंमलदारांना पदोन्नती 

अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस दलातील 173 पोलीस अंमलदार यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये सत्ताविस पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर, 144 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदावर तर दोन चालक पोलिस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर  बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश 27 आॅक्टोबर निर्गमित करण्यात आले आहेत.

रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण 173 पोलीस अंमलदार यांना  27 आॅक्टोबर 2023 रोजी पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. शासन निर्णयानुसार रायगड पोलीस दलाचे आस्थापनेवरील सुधारित आकृती बंधानुसार मान्यता देण्यात आली असून, सुधारित आकृती बंधानुसार हि पदे उपलब्ध झाल्याने त्या पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदर यांना पदोन्नती देण्याची ही पाहिलीच वेळ आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पदोन्नती  मिळालेल्या सर्व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
 

Web Title: Promotion of 173 Police Officers in raigad