खासगी स्पीड बोट आगीच्या भक्ष्यस्थानी; मांडवा बंदरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 07:02 IST2023-12-03T07:01:53+5:302023-12-03T07:02:16+5:30

दोघे किरकोळ जखमी, जेट्टीवर गोंधळ

Private speed boat on fire; Mandwa port incident | खासगी स्पीड बोट आगीच्या भक्ष्यस्थानी; मांडवा बंदरातील घटना

खासगी स्पीड बोट आगीच्या भक्ष्यस्थानी; मांडवा बंदरातील घटना

अलिबाग : मुंबई गेटवे येथून मांडवा बंदरात दाखल झालेल्या एका खासगी स्पीड बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली. बोटीतील एसीसाठी असलेल्या जनरेटच्या जंक्शनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. 

बोटीतील कर्मचारी दिलदार मारणे, मोजिन दोघे (रा.वेशवी, बाणकोट) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात आले आहे. मरीन सोलुशन कंपनीची बेलार्डर बोट मुंबईतून प्रवासी घेऊन मांडवा जेटी येथे आली होती. 

मुंबई गेटवे येथून मांडवा बंदरात दाखल झालेल्या एका खासगी स्पीड बोटीला एसीसाठी असलेल्या जनरेटच्या जंक्शनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. आगीनंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. 

Web Title: Private speed boat on fire; Mandwa port incident