शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राखीव उद्यानातून नेली खासगी पाइपलाइन, ग्रामस्थांमधून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:16 IST

शहराच्या लगत असलेले आणि डोमॅटरी सिटीत समाविष्ट असलेल्या ममदापूर गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे.

- कांता हाबळे नेरळ : शहराच्या लगत असलेले आणि डोमॅटरी सिटीत समाविष्ट असलेल्या ममदापूर गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभे रहात असताना त्याठिकाणी उद्यानासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आलेला आहे. मात्र राखीव भूखंडाचा स्वत:साठी वापर करत एका बिल्डरने त्या उद्यानाच्या भूखंडातून बिल्डिंगसाठी पाइपलाइन नेली आहे. यासाठी कोणाची परवानगी देखील न घेतली नसल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.कर्जत तालुक्यातील नेरळने शहरीकरणाकडे कधीच वाटचाल सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून उपनगरीय शहरांना नेरळ जोडले गेल्याने या ठिकाणी काहीच वर्षात झपाट्याने नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाचा विचार करत शासनाच्या नगरविकास विभागाने याठिकाणी नेरळ विकास संकुल प्राधिकरण लागू केले. या प्राधिकरणात नेरळजवळची ममदापूर बोपेले, धामोते या गावांचा देखील समावेश केल्याने अल्पावधीत या ठिकाणी मोठमोठे गृहप्रकल्प साकारण्यास सुरवात झाली. त्यामध्ये ममदापूर येथे उद्यानासाठी दीड एकराचा भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये उद्यान विकसित करण्यासाठी त्या भूखंडाचे उद्घाटन देखील केले होते. असे असताना ममदापूर येथे अमरदीप कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायिकाचे सुमारे ३ बिल्डिंगचे काम सुरु आहे. त्यातील एका इमारतीला पाण्याच्या कनेक्शनसाठी या धनदांडग्याने उद्यानाच्या भूखंडाच्या मध्यात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून त्यातून पाण्याची लाइन नेली आहे. उद्यानाच्या मागील बाजूस अमरदीप या बिल्डिंगला एक कनेक्शन देऊन पुढील दोन पाऊण इंची कनेक्शन दुसऱ्या इमारतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या इमारतीत एकूण ३४ सदनिका असणार आहेत. त्यामुळे पाण्याची कमतरता पडू नये म्हणून नेरळ ग्रामपंचायतीकडून अधिकृतरीत्या हे कनेक्शन घेतल्याचे समजते.मुख्य म्हणजे राखीव असलेल्या भूखंडातून पाइपलाइन नेण्यासाठी कोणाचीही साधी परवानगी घेण्याची बिल्डरला गरज वाटली नाही. हा सगळा प्रकार स्थानिकांना समजल्यावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. मुळात गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह संपूर्ण कुटुंबांची फरफट सुरु आहे, परंतु बिल्डरांना मुबलक पाणी मिळते आहे हा देखील संशोधनाचा भाग आहे.>प्राधिकरणाची यासाठी परवानगी घेतलेली नाही. अशी परवानगी देखील देता आली नसती. कारण ममदापूर येथील तो उद्यानासाठी राखीव भूखंड आहे त्यामुळे झालेला प्रकार चुकीचा आहे. संबंधित बिल्डरला नोटीस पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.- प्रवीण आचरेकर, तांत्रिक अधिकारी,नेरळ विकास प्राधिकरणयेथील स्थानिकांना पिण्यासाठी पाणी नाही. आमच्या मुलांची महिलांची पाण्यासाठी फरफट सुरु असताना या बिल्डरलॉबीला पाणी मिळते. त्यातूनही ते राखीव जागेतून पाइपलाइन घेऊन चाललेत. त्यांना जे वाटेल ते हे करणार का ? यांच्या मनमानीला प्राधिकरण आणि ग्रामपंचायत का सहन करते ? मात्र आम्ही गप्प बसणार नाहीत. जे चुकीचे आहे ते आम्ही तिथेच थांबवणार.- सुनील सोनावळे,ग्रामस्थ ममदापूर