पनवेलजवळ कर्नाळा खिंडीत खाजगी बसला अपघात; प्रवासी किरकोळ जखमी
By वैभव गायकर | Updated: September 7, 2023 16:10 IST2023-09-07T16:10:29+5:302023-09-07T16:10:54+5:30
दुपारी 2.15 च्या सुमारास घडली घटना

पनवेलजवळ कर्नाळा खिंडीत खाजगी बसला अपघात; प्रवासी किरकोळ जखमी
लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खंडित वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस दुसऱ्या मार्गिकेवर गेल्याने अपघात झाल्याची घटना आज रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास घडली. या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
पनवेल वरून अलिबाग जेएसडब्लू कंपनीत हि बस जात होती.या दरम्यान कर्नाळा खंडित सांडलेल्या ऑइलमुळे बस चालकाचा ताबा सुटून हि बस पनवेलकडे येणाऱ्या मार्गावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतुक खोळंबली होती.यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सोडवली.या बसला देखील बाजूला केले. बसमध्ये 30 प्रवासी होते. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.