व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कैदी साधणार नातेवाईकांशी संवाद, तळोजा कारागृहात ई किस्कॉय

By वैभव गायकर | Published: March 4, 2024 04:48 PM2024-03-04T16:48:17+5:302024-03-04T16:48:34+5:30

कैद्यांना न्यायालयीन तारखा आणि पेरॉल सुविधेसह ग्रुप फोन सुविधा मिळणार आहे.

Prisoners to communicate with relatives through video conference, E Kiskoy in Taloja Jail | व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कैदी साधणार नातेवाईकांशी संवाद, तळोजा कारागृहात ई किस्कॉय

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कैदी साधणार नातेवाईकांशी संवाद, तळोजा कारागृहात ई किस्कॉय

पनवेल: तळोजा कारागृहातील कैद्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या नातेवाईकांना ई मुलाखत देता येणार आहे.या हायटेक सुविधेचे नाव 
ई किस्कॉय आणि ग्रुप फोन असून सोमवार दि.4 रोजी या यंत्रणेचे उदघाटन अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता हे देखील उपस्थित होते. कैद्यांना न्यायालयीन तारखा आणि पेरॉल सुविधेसह ग्रुप फोन सुविधा मिळणार आहे.

तळोजा कारागृह हा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कारागृह आहे. 2008 साली सुरु झालेल्या या कारागृहात सध्याच्या घडीला जवळपास तीन हजार कैदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये बॉम्बस्फोट, दंगल, नक्षलवादी, देश विघातक घटना आदींसह अनेक मोठ मोठ्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा समावेश आहे. या बायोमेट्रिक टच स्क्रीन मशीनमुळे कैद्यांना कुटुंबातील सदस्यांच्या सेलफोन नंबरवर सणाच्या शुभेच्छा पाठवता येणार आहेत. दुसऱ्या सुविधेच नाव ग्रुप फोन सुविधा आहे. एलन ग्रुप या तामिळनाडू स्थित कंपनीने सर्वप्रथम देशात हि सुविधा उभारली आहे. यापूर्वी येरवडा मध्यवर्ती कारागृहात 40 कॉलिंग बूथ स्थापित केले आहेत. राज्याच्या गृहविभागाने तामिळनाडूस्थित कंपनीची मोफत कैदी कॉलिंग प्रणाली सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार तळोजा कारागृहात या सुविधांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भायखळा कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह अधिक्षक  प्रमोद वाघ, उपअधीक्षक महादेव पवार, तुरुंग अधिकारी  राहुल झुटाले आदी उपस्थित होते.

आठवड्यातून तीन वेळा करता येणार फोन -

कैद्यांना आठवड्यातील 3 वेळा फोन करता येणार आहेत.6 मिनिटांच्या या फोन दरम्यान नातेवाईक, वकील आदींना फोन करता येणार आहेत.एकुण 10 मशीन तळोजा कारागृहात बसविन्यात आल्या आहेत.या सुविधेमुळे कैद्यांच्या नातेवाईकांना कारागृहात कैद्यांना भेटण्यासाठी कारागृहाचे खेटे मारन्याची गरज नाही.

Web Title: Prisoners to communicate with relatives through video conference, E Kiskoy in Taloja Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल