शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा गोळीबाराचा सराव ग्रामस्थांच्या जीवावर; खिडकीतून गोळ्या घुसल्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:53 IST

मुलगी बचावली; ग्रामस्थांमध्ये भीती

अलिबाग : तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घरात घुसली. घरात राहणाऱ्या मुलीच्या अगदी जवळून बंदुकीची गोळी गेल्याने ती थोडक्यात बचावली आहे. कार्ले गावामध्ये सातत्याने असा थराररक घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सराव मैदान आणि गावाच्या मध्ये मोठी संरक्षक भिंत उभारून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पोलिसांना अचूक निशाणा साधण्यासाठी सरावाची गरज असल्याने सरावासाठी परहूर पाडा येथे पोलीस सराव मैदान उभारण्यात आले. हे मैदान कुलाबा जिल्हा अस्तित्वात असानाच पोलीस विभागाने निर्माण केले होते. सध्या याच सराव मैदानावर राज्यातील पोलीस गोळीबार करण्याचा सराव करतात. सराव मैदानाच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडे कार्ले गाव आहे. या गावामध्ये सुमारे सव्वादोनशे घरे आहेत. गुरुवारी सायंकाळी पोलिसांचागोळीबार करण्याचा सराव सुरू असताना बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या कार्ले गावातील विजय पाटील यांच्या घरातील खिडकीच्या काचा फोडून घरात घुसल्या. बंदुकीतून सुटलेली गोळी पाटील यांच्या मुलीच्या अगदी जवळून गेली. त्यामध्ये ती थोडक्यात बचावली. सुरुवातीला त्यांना वाटले की घरावर कोणी तरी दगड मारला असेल; परंतु घरात बंदुकीची गोळी सापडल्याने प्रकार उघड झाला. अशाच अन्य गोळ्या गावात आढळून आल्या आहेत. काही गोळ्या या डोंगरातील दगडांवर आपटून वाकड्या होऊनही गावात घुसल्या, त्यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.गावातील अन्य ठिकाणीही गोळ्या सापडल्याने गावातील लोक एकत्र जमा झाले. त्यांनी तातडीने सदरची घटना सरपंचाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अलिबाग पोलिसांना कळवण्यात आले. शुक्रवार अलिबाग पोलिसांनी पाटील यांच्या घराची पाहणी करून पंचनामा केला, तसेच बंदुकीची गोळीही ताब्यात घेतली.सुदैवाने हानी झाली नाहीबंदुकीतून सुटलेली गोळी माझ्या बहिणीच्या अगदी जवळून गेली, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. दोन गोळ्या सापडल्या आहेत, अजून एक गोळी घराच्या पत्र्यावर अडकल्याची शक्यता आहे, असे स्वप्निल पाटील याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अशा घटना नेहमीच या भागात घडत असल्याने कार्ले गावातील ग्रामस्थ हे भीतीच्या छायेत आहेत. पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे स्वप्निल याने स्पष्ट केले.कार्ले गावातील विजय पाटील यांच्या खिडकीतून बंदुकीची गोळी घरात आल्याने कार्ले गावात भीती निर्माण झाली आहे. पोलिसांचा गोळीबार सराव ज्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी सरकारने मोठी संरक्षक भिंत उभारल्यास सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या अन्य ठिकाणी घुसणार नाहीत, अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे.विजय पाटील यांच्या घरातील गोळी एके-४७ या शस्त्रातील एके-४७ या शस्त्रातून गोळीबार करण्याचा सराव परहूर पाडा येथील पोलीस सराव मैदानावर सुुरू आहे. गुरुवारी पाटील यांच्या घरामध्ये घुसलेली गोळीही त्याच अत्याधुनिक शस्त्रातील असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक यांचा सराव गुरुवारी सुरू होता. एके-४७ या शस्त्रातून गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना काही गोळ्या समोरील डोंगरावर आदळून कार्ले गावाच्या दिशेने घुसल्या आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सराव कराताना काळजीपूर्वक करावा, तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसRaigadरायगडFiringगोळीबार