गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज

By Admin | Updated: September 15, 2015 23:25 IST2015-09-15T23:25:30+5:302015-09-15T23:25:30+5:30

गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्याशिवाय सुरळीत पार पडण्याकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Police are ready for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज

गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज

अलिबाग : गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्याशिवाय सुरळीत पार पडण्याकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. स्वत: पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार, ८ उप विभागीय पोलीस अधिकारी, २५ पोलीस निरीक्षक, ३६ सहा.पोलीस निरीक्षक, ७३ पोलीस उप निरीक्षक अशा एकूण १४४ पोलीस अधिकाऱ्यांसह २ हजार १९१ पोलीस जिल्ह्यात सज्ज झाले आहेत.
रायगड पोलीसच्या नियोजित पोलीस कुमकेस सहाय्य करण्याकरिता केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १०० जवान, गृहरक्षक दलाचे ३६४ पुरुष व ६४ महिला कर्मचारी यांजबरोबर नवप्रविष्ट १० पोलीस निरीक्षक अशी अतिरिक्त कुमक जिल्ह्यात आणण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कोठेही कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ती सत्वर हाताळण्याकरिता माणगाव व वडखळ येथे प्रत्येकी एक पोलीस अधिकारी व प्रत्येकी ६० पोलीस अशी पथके तैनात आहेत. जिल्ह्यातील ८ उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली एक अधिकारी व २० पोलिसांचा ‘स्टॉयकिंग फोर्स’ आहे. दंगाकाबू नियोजनांतर्गत एक अधिकारी व २० पोलिसांचे पथक आहे.

Web Title: Police are ready for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.