पाली - वाकण मार्गावर लूट

By Admin | Updated: June 16, 2016 00:40 IST2016-06-16T00:40:56+5:302016-06-16T00:40:56+5:30

पाली - खोपोली मार्गावर असलेली गंध सुगंध कंपनी व जंगली पीर या दोन ठिकाणी ९ ते १० अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबून मंगळवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान जबर मारहाण करून

POL - Booty on the Bent Road | पाली - वाकण मार्गावर लूट

पाली - वाकण मार्गावर लूट

पाली : पाली - खोपोली मार्गावर असलेली गंध सुगंध कंपनी व जंगली पीर या दोन ठिकाणी ९ ते १० अनोळखी व्यक्तींनी गाडी थांबून मंगळवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान जबर मारहाण करून दोघांकडील रोख रक्कम काढेन घेतली.
स्वप्नील दळवी (३०, रा. भांडीवली, ता. माणगाव) हे आयशर टेम्पोने खोपोली ते गोवा प्रवास करीत होते, तर अनिल पारधी (३६, रा. नाशिक) टेम्पो घेऊन पुणे ते महाड असा प्रवास करीत असताना सुधागडमधील जंगली पीर व गंध सुगंध या कंपनीजवळ चार दुचाकींवरून ९ ते १० जणांनी येऊन गाड्या अडवून मारहाण करून स्वप्नील दळवी यांच्याकडून २५ हजार तर अनिल पारधी यांच्याकडून पाच हजार अशी ३० हजारांची रोकड घेऊन पळ काढला. याप्रकरणी पोलिसांत तक्र ार नोंदविली आहे. (वार्ताहर)

Web Title: POL - Booty on the Bent Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.