शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी 'पी अँड जी शिक्षा'चं मोठं योगदान; रायगड जिल्ह्यात स्वच्छतेची कार्य'शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:42 IST2025-07-24T17:27:28+5:302025-07-24T17:42:09+5:30
२००५ मध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'पी अँड जी शिक्षा' सुरू करण्यात आली. शिक्षण हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं.

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी 'पी अँड जी शिक्षा'चं मोठं योगदान; रायगड जिल्ह्यात स्वच्छतेची कार्य'शाळा'
एरियल, टाइड, जिलेट, व्हिस्पर या ब्रँड्सची निर्माता असणाऱ्या प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाने (P&G India) त्यांच्या प्रमुख सीएसआर उपक्रम, 'पी अँड जी शिक्षा'द्वारे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी मोठं योगदान दिलं आहे. गेली २० वर्षे ते सातत्याने शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. पी अँड जी शिक्षाने हजारो शाळा आणि वंचित समुदायांना पाठिंबा दिला, ज्यातून ५० लाखांहून अधिक मुलांचा फायदा झाला. याच दरम्यान असंख्य प्रेरणादायी गोष्टी समोर आल्या आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने चांगलं काम करण्यात येत आहे.
२००५ मध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पी अँड जी शिक्षा सुरू करण्यात आली. शिक्षण हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. सीएसआर कायदा लागू होण्यापूर्वीच सुरू झालेला हा उपक्रम देशाच्या गरजेनुसार राहिला आहे. देशभरात शाळा सुरू करण्यासाठी पी अँड जी शिक्षा हा एक कार्यक्रम सुरू झाला होता आणि आज तो विकसित झाला. शिक्षणातील तफावत रोखण्यासोबतच साक्षरतेसाठी मोठं योगदान देत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमाचा वंचित समुदायांवर सकारात्मक प्रभाव पडला आणि ५० लाखांहून अधिक मुलांना याचा फायदा झाला.
खालापूरमध्ये स्वच्छता जागरूकता कार्यशाळेचं आयोजन
उन्हाळ्यामध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाच्या जगातील नंबर १ डिटर्जंट ब्रँड टाइडने पी अँड जी इंडियाच्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमासोबत भागीदारी केली. "जेव्हा मुलं स्वच्छतेचं महत्त्व शिकतात, तेव्हा ते आयुष्यभर लक्षात ठेवतात" या एका साध्या पण प्रभावशाली विचारावर चर्चा सुरू झाली. याचाच एक भाग म्हणून टाइडने महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर या ग्रामीण भागातील वंचित समुदायात एक विशेष स्व-स्वच्छता जागरूकता कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी मुलांना स्वच्छ आणि निरोगी राहण्याच्या सर्वोत्तम पद्धती शिकवल्या जेणेकरून ते दररोज एक नवीन,चांगली सुरुवात करू शकतील.
शाळेचे गणवेश स्वच्छ धुवून दिले परत
टाइड आणि पी अँड जी शिक्षा यांनी घरोघरी जाऊन मुलांच्या शाळेचे गणवेश गोळा केले, जे नंतर स्वच्छ धुवून त्यांना परत दिले. कार्यशाळेदरम्यान आम्ही मुलं आणि त्यांची आई या दोघांसाठी ब्रँडच्या उत्कृष्ट स्वच्छता कामगिरीचं प्रदर्शन दाखवण्यासाठी इंटरएक्टिव्ह टाइड डेमो सेशन देखील आयोजित केलं. या लाईव्ह डेमो सेशनमुळे टाइडची डाग काढून टाकण्याची शक्तिशाली क्षमता अधोरेखित झाली, ज्यामुळे कुटुंबांना स्वच्छतेची योग्य पद्धत आणि योग्य क्लीनिंग प्रोडक्ट किती प्रभावी असू शकतं हे प्रत्यक्षपणे पाहण्यास मदत झाली.
स्वच्छतेची नीट काळजी घेण्याचं वचन
लहान मुलांना त्यांच्या पालकांसाठी हाताने स्पेशल कार्ड तयार करण्याची संधी देण्यात आली. यामधून मुलांनी त्यांचं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कार्यशाळेत शिकलेल्या गोष्टींचा वापर करून स्वच्छतेची नीट काळजी घेण्याचं वचन दिलं. खालापूरमधील मुलं देखील पी अँड जी शिक्षा समर कँप २०२५ मध्ये सहभागी झाली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून पी अँड जी शिक्षा द्वारे विशेष देशव्यापी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणांसोबतच ते लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत आहेत. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करत आहेत.