शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पेण बाजार समितीवर शेकाप

By admin | Updated: July 27, 2015 02:59 IST

पेण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाले असून शिवसेना-काँग्रेस युती,

पेण : पेण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाले असून शिवसेना-काँग्रेस युती, भारतीय जनता पक्ष या विरोधी पक्ष उमेदवारांचा धुव्वा उडाला. तब्बल १५० मतांच्या फरकाने प्रत्येक उमेदवार विजयी झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापची संघटनात्मक पाळेमुळे खोलवर रूजलेली असल्याने खरेदी-विक्री संघापाठोपाठ पेण कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापने सातव्यांदा तब्बल ३५ वर्षे आपली सत्ता अबाधित राखली आहे.ग्रामपंचायत गटात शेतकरी कामगार पक्षाचे सुरेश पाटील २७४ मते, संदेश ठाकूर २७१ मते, स्मिता पेणकर ३४७ मते, व लहू आवटे ३५९ मते मिळवून विजयी झालेत. या गटात पराभूत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे मिलिंद मोकल १४९ मते, काँग्रेसचे राजेश मोकल १२९ मते, काँग्रेसच्या लक्ष्मी नाईक १५७ मते तर भालचंद्र घरत (स्वतंत्र) १३७ मते या उमेदवारांचा १५० हून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. सहकारी कृषी पतसंस्था गटात शेतकरी कामगार पक्षाचे एकहाती वर्चस्व असल्याने भाऊ एरणकर यांना २३३, रामदास घासे २३३, कृष्णा म्हात्रे २२९, भाऊ म्हात्रे २३२, प्रफुल्ल म्हात्रे २३५, नितीन पाटील २३२, शरद पाटील २२६ मते मिळाल्याने या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी एकहाती विजय संपादन केला. या गटातील विरोधी उमेदवार काशिनाथ पाटील यांना फक्त २८ मते मिळून डिपॉझिट जप्त झाले. व्यापारी आडते गटात शेतकरी कामगार पक्षाचे राजेश गाला १५१ व राकेशकुमार शहा १४८ मते मिळून विजयी झाले. विरोधी उमेदवार प्रकाश पाटील यांना २६ मते मिळून डिपॉझिट जप्त झाले.बिनविरोध उमेदवारात शेतकरी कामगार पक्षाचे प्रमोद तथा पिंट्या भास्कर पाटील, नीलम हरिश्चंद्र पाटील, निशा प्रकाश पाटील, दादू भाऊ कोकले व गजानन नामदेव पाटील या पाच उमेदवारांसह मतमोजणीत विजयी झालेले १३ असे १८ पैकी १८ जागी शेतकरी कामगार पक्षाने एकहाती वर्चस्व मिळवले. यावेळी विजयी उमेदवारांचे आमदार धैर्यशील पाटील यांनी अभिनंदन केले. विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)