शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सकारात्मकतेमुळेच पतसंस्थेची भरभराट; जिल्ह्यातील पतसंस्था संचालक, कर्मचा-यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:55 AM

सहकार ही विश्वासावर चालणारी चळवळ आहे. जीएसटीचा फटका देशभरातील पतसंस्थांना बसलाय. सकारात्मक धोरण, कायदा, परिपत्रक आणि निर्णयांचा आदर केल्यास पतसंस्था कधीच अडचणीत येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

अलिबाग : सहकार ही विश्वासावर चालणारी चळवळ आहे. जीएसटीचा फटका देशभरातील पतसंस्थांना बसलाय. सकारात्मक धोरण, कायदा, परिपत्रक आणि निर्णयांचा आदर केल्यास पतसंस्था कधीच अडचणीत येणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघ आणि सहकार भरती सहकारी प्रशिक्षण सहकारी संस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे जिल्ह्यातील पतसंस्था संचालक आणि कर्मचारी यांच्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शेखर चरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा उपनिबंधक पी. एम. खोडका, सहकार भरतीचे अखिल भारतीय महासचिव प्रा. डॉ. उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनचे संचालक सुरेश पाटील, रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी, सचिव योगेश मगर, धुळे येथील चार्टर्ड अकाउंटंड श्रीराम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.चरेगावकर म्हणाले, पतसंस्थांची सद्यस्थिती संक्र मणावस्थेत असल्याचा डंका सहकार चळवळीतील पदाधिकारीच पिटत आहेत. सरकारच्या धोरणामुळे आणि नव्या कायद्यामुळे संस्थाचालक घाबरले आहेत. संस्थाचालकांनी आपला दृष्टिकोन बदलायला हवा. सकारात्मक मानसिकता ठेवून कायद्यानुसार अर्थ व्यवहार करायला हवे, तरच पतसंस्था प्रगतीकडे नेता येईल, असे त्यांनी नमूद केले.सहकार चळवळ ही लोकांनी लोकांसाठी चालविलेली चळवळ आहे. कायदे नसताना चळवळ अस्तित्वात आली आणि आता यापुढे कितीही कायदे आले तरी सहकार चळवळ मागे पडणार नाही. नव्या सहकार कायद्यानुसार चुकीचे काम करणारेच अडचणीत येतात, यासाठी कायदा, परिपत्रक आणि निर्णयाचा आदर करायला संस्था चालविणाºयांनी शिकायला हवे. आजच्या नव्या कायद्याच्या सरोवरात पतसंस्थांना तारण्यासाठी मानसिकता बदलून योग्य सल्ल्यानुसार पोहायला शिकायला हवे, असे शेखर चरेगावकर म्हणाले.लाखोंना रोजगार आणि कुटुंबे पोसण्याची ऊर्जा पतसंस्थांनी दिलीसहकार चळवळीतून उभ्या राहिलेल्या पतसंस्था या उपजीविकेचे साधन बनल्या आहेत. लाखोंना रोजगार आणि कुटुंबे पोसण्याची ऊर्जा पतसंस्थांनी दिली आहे. हे उपजीविकेचे साधन अधिक सक्षम बनविण्यासाठी सहकार चळवळीत काम करणाºयांनी पुढाकार घ्यायला हवा, असा सल्ला चरेगावकर यांनी अखेरीस दिला.विविध सत्रांत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शनकार्यक्र माच्या प्रास्ताविकात रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील यांनी जिल्ह्यातील पतसंस्था आणि सहकार चळवळीचा आढावा घेतला, तर सूत्रसंचालन योगेश मगर यांनी केले. जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांचे संचालक, चेअरमन, कर्मचारी या प्रशिक्षण वर्गास मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. विविध सत्रांत तज्ज्ञ मार्गदर्शक या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे सचिव योगेश मगर यांनी दिली.