कोरोनाच्या सावटाखाली पनवेलकरांची प्रशासनाला साथ; नियमांचे होते पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:17 IST2020-08-26T00:17:22+5:302020-08-26T00:17:32+5:30
मागील वर्षी १५७ सार्वजनिक गणपती मंडळांनी, २१३ सोसायटीतील मंडळांनी, तर ४५,७१४ घरगुती व्यक्तींनी गणेशोत्सव साजरा केला होता.

कोरोनाच्या सावटाखाली पनवेलकरांची प्रशासनाला साथ; नियमांचे होते पालन
वैभव गायकर
पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. यामध्ये गणपतीच्या उंचीपासून विसर्जन घाट, मिरवणुकीबाबत प्रशासनाच्या नियमांचे पालन करत पनवेलमधील नागरिक सहकार्य करीत आहेत.
मागील वर्षी १५७ सार्वजनिक गणपती मंडळांनी, २१३ सोसायटीतील मंडळांनी, तर ४५,७१४ घरगुती व्यक्तींनी गणेशोत्सव साजरा केला होता. या वर्षी ८६ सार्वजनिक गणपती मंडळांनी, ११५ सोसायटीतील मंडळांनी, ३९,०१८ घरगुती व्यक्ती गणेशोत्सव साजरा करीत आहेत. विशेष म्हणजे, ५४ सार्वजनिक मंडळांनी, ३७ सोसायट्यांतील मंडळांनी, ५,९२४ घरगुती व्यक्तींनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचा गणेशोत्सव आयोजित करीत प्रशासनाला सहकार्य केले आहे. विसर्जन घाटांवर गर्दी न करता, नागरिकांनी सोसायटी, तसेच घरातल्या परिसरातच गणपतीचे विसर्जन केले. पालिकेने ४१ ठिकाणी विसर्जन घाट तयार केले होते, तरी ६० टक्के नागरिकांनी आपल्या परिसरातच उभारलेल्या कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन केले. विसर्जन घाटांवरही नागरिकांनी यावेळी गर्दी केली नव्हती, अशी प्रतिक्रिया पालिकेचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.