पनवेल : एचपी पेट्रोलपंपाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 15:46 IST2023-01-08T15:45:38+5:302023-01-08T15:46:44+5:30
दुपारी एक वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.

पनवेल : एचपी पेट्रोलपंपाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग
पनवेल: पनवेल जवळील भिंगरी येथील एचपी पेट्रोलपंपा जवळ एका महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग लागल्याची घटना घडली. शॉटसर्किटमुळे अचानकपणे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी एक वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.
पळस्पेकडून पनवेलकडे जाणाऱ्या रस्तावरुन सिल्वर रंगाची महिंद्रा एक्सयुव्ही गाडी नंबर एम एच ०४ एफ एफ ९३२९ घेऊन दोघेजण येत असताना अचानकपणे गाडीच्या बोनेट मधून धूर येऊ लागला. त्यानंतर त्यांनी आपली गाडी एचपी पेट्रोलपंपाजवळ उभी केली आणि मॅकेनिकला बघण्यासाठी ते दोघे गाडी बाहेर पडले. यानंतर गाडीने अचानकपणे पेट घेतला.
पनवेल : एचपी पेट्रोलपंपाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग pic.twitter.com/ER0nYNFORr
— Lokmat (@lokmat) January 8, 2023
आजूबाजूच्या नागरिकांनी गाडीला लागलेली आग विझवण्यासाठी तेथे धाव घेतली. काहींनी वाहतूक शाखेचे पोलीस तसेच अग्निशमक दलाला कळवले. त्यांचे पथके घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत गाडीचे पूर्णतः नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे.