कवाळटे केळघर येथे दरड कोसळली; रोहा मुरुड रस्ता बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:26 IST2021-06-17T15:25:44+5:302021-06-17T15:26:15+5:30
Raigad : गुरूवारी पहाटे या भागात दरडी कोसळण्यास सुरवात झाली, गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगर खचत गेला आणि पहाटे मोठ मोठे दगड झाडे रस्त्यावर आली.

कवाळटे केळघर येथे दरड कोसळली; रोहा मुरुड रस्ता बंद!
रोहा : बुधवारपासून तालुक्यात जोरदारपणे पाऊस सुरू आहे. दरम्यान, रोहा मुरुडला जोडणारा सर्वाधिक जवळचा मार्ग असलेल्या केळघर मार्गे मुरुड रस्त्यावर कवाळटे येथे दरड कोसळल्याने हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
या रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या दगडी साचल्याने रस्ता पूर्ण बंद झाला. रस्त्यावर दगड, मातीसह मोठ मोठी झाडे उलमलून पडली आहेत. येथील सामजिक कार्यकर्ते महेश वरक, चंद्रकांत जाधव, व अन्य नागरिकांनी मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला परंतु दगडी मोठया आसल्याने त्यांचे प्रयत्न असफल झाले आहेत.
गेले काही वर्ष सातत्याने या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गुरूवारी पहाटे या भागात दरडी कोसळण्यास सुरवात झाली, गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगर खचत गेला आणि पहाटे मोठ मोठे दगड झाडे रस्त्यावर आली. कोणतेही वाहन जात नसल्याने तसेच या वेळी हा भाग निर्मनुष्य आल्याने कोणतेही जीवित हानी झाली नाही, परंतु रोहा मुरुड या दोन तालुक्यांमधील दळण वळणाचा सर्वात जवळचा मार्ग बंद झाला आहे.