शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यू कंपनीवर कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 23:30 IST

कोकण आयुक्तांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश : जुईबापूजी येथील तब्बल १.८४ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनांचा ºहास

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जुईबापूजी येथील तब्बल १.८४ हेक्टर क्षेत्रावर एका बलाढ्य कंपनीने अतिक्रमण करून तेथील कांदळवनांचा ºहास केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेश कोकण आयुक्तांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.विविध सरकारी अहवालानुसार जेएसडब्ल्यू कंपनीने १९९६पासूनच अलिबाग तालुक्यातील मौजे जुईबापूजी येथील स.नं. ५०/ड, क्षेत्र १.८४ हे.आर. बेकायदेशीपणे ताब्यात ठेवले असल्याची बाब अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये उघडकीस आणली होती. या प्रकरणी संबंधित कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी सातत्याने लावून धरली आहे. मात्र, प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवले जात असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याचप्रमाणे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अशरफ घट्टे यांनी कपंनीने केलेल्या बेकायदा कामांबाबत थेट सचिवांकडे तक्रार केली होती. जेएसडब्ल्यू विरोधात सर्वच स्तरातून तक्रारी येत असल्याने त्याची दखल आता कोकण आयुक्तांनी घेतली आहे.कंपनीने केलेले अतिक्रमण, तसेच कांदळवनांचा केलेला ºहासाबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावे, असे आदेश ६ आॅगस्ट, २०२० रोजीच्या पत्रान्वये कोकण आयुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास उच्च न्यायालयात २००४ साली दाखल झालेल्या रिट याचीकेतील ६ आॅक्टोबर, २००५ रोजीच्या आदेशानुसार त्याचप्रमाणे, २००६ मध्ये रूपांतरित झालेल्या जनहित याचिकेतील दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करावी, असे आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे.पर्यावरणमंत्र्यांकडे तक्रार दाखलप्रकल्पाच्या विस्ताराकरिता वनेत्तर कामे विनापरवाना केली असल्याचा अहवाल उप वनसंरक्षक अलिबाग यांनी १३ नोव्हेंबर, २०१९ रोजी रायगड जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख यांनी तर खुद्द निवासी उपजिल्हाधिकारी यांनाच २३ जानेवारी, २०२० रोजी अहवाल सादर करून कंपनीने केलेल्या कांदळवन तोडीबाबत स्थळपाहणी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे पर्यावरण अधिनियम १९८६ च्या कलम १९ अनुसार आपणास प्राधिकृत केल्याप्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे कळविणे आवश्यक होते, परंतु तसे न करता केवळ कागदी घोडे नाचवून कंपनीला पर्यावरण कायद्याखाली दाखल होणाºया गुन्ह्यापासून वाचविण्याचे काम महसूल विभगाचे अधिकारी करीत आहेत, असे संजय सावंत यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना २२ सप्टेंबर रोजी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.तत्कालीन कोकण आयुक्तांनीच २००५ मध्ये ही जमीन खरेदी करण्याची परवानगी आम्हाला दिली होती. कंपनीने जमीन खरेदी केली, त्यावेळी त्या जमिनीवर कांदळवन नव्हते. आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही.-नारायण बोलबुंडा, जेएलडब्ल्यू, जनसंपर्क प्रमुख

कोकण आयुक्तांच्या पत्राबाबत अलिबागच्या प्रांताधिकारी यांचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणी त्यांना कार्यवाही करण्यास आदेशीत केले आहे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल.- पद्मश्री बैनाडे, निवासी उप जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :environmentपर्यावरण