उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता

By राजेश भोस्तेकर | Updated: September 28, 2023 20:57 IST2023-09-28T20:56:36+5:302023-09-28T20:57:20+5:30

एक जण सुखरूप बाहेर आला असून एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच दोन जण बेपत्ता असल्याची माहिती नागरिकांकडून मिळते.

One person who went for Ganesh immersion in Ulhas river drowned, two people went missing | उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता

उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता

अलिबाग : कर्जत भिवपुरी येथील चांदई जवळील उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेले दोन भक्त पाण्यात बुडाले आहेत. उकृळ येथे असलेल्या बिल्डींग मधील चौघे जण गणेश विसर्जन करण्यासाठी आले होते. त्यांना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले.

त्यांतील एक जण सुखरूप बाहेर आला असून, एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच दोन जण बेपत्ता असल्याची माहिती नागरिकांकडून मिळते.
 

Web Title: One person who went for Ganesh immersion in Ulhas river drowned, two people went missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.