नागाव दुर्घटनेतील एक जण बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 04:41 IST2018-05-28T04:41:19+5:302018-05-28T04:41:19+5:30

कोपरखैरणे मधील चैतन्य किरण सुळे, आशिष रामनारायण मिश्रा आणि सुहाद सिद्दगी हे तिघे युवक शुक्र वारी अलिबाग जवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बेपत्ता झाले.

One person missing from Nagaon accident | नागाव दुर्घटनेतील एक जण बेपत्ताच

नागाव दुर्घटनेतील एक जण बेपत्ताच

विशेष प्रतिनिधी 
अलिबाग  - कोपरखैरणे मधील चैतन्य किरण सुळे, आशिष रामनारायण मिश्रा आणि सुहाद सिद्दगी हे तिघे युवक शुक्र वारी अलिबाग जवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बेपत्ता झाले. त्या पैकी आशिष मिश्रा आणि सुहास सिद्दगी याचे मृतदेह शनिवारी सापडल्यावर सायंकाळी त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, चैतन्य किरण सुळे हा मात्र अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध रायगड पोलीस गस्तीनौका आणि तटरक्षक दलाच्या बोटींतून घेण्यात येत असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश वराडे यांनी दिली. रायगडच्या किनारपट्टीतील सागरीसुरक्षा दलाच्या सदस्यांना देखील किनारी भागात नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: One person missing from Nagaon accident