उंबर्डीत संशयावरून एकाचा खून

By Admin | Updated: November 4, 2015 00:48 IST2015-11-04T00:48:37+5:302015-11-04T00:48:37+5:30

तालुक्यातील उंबर्डी आदिवासीवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन गळा चिरु न खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माणगांव पोलिसांनी तपास करुन

One murdered Umbard's suspicion | उंबर्डीत संशयावरून एकाचा खून

उंबर्डीत संशयावरून एकाचा खून

माणगांव : तालुक्यातील उंबर्डी आदिवासीवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन गळा चिरु न खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माणगांव पोलिसांनी तपास करुन आरोपीला १८ तासांत जेरबंद केले आहे.
उंबर्डे आदिवासीवाडी येथील गणपत जाधव हे पत्नी व आईसह जंगलात एकच घर असलेल्या ठिकाणी राहतात. ३१ आॅक्टोबरला गणपत जाधव जेवण करुन झोपी गेल्यानंतर रात्री आई व पत्नीला जाग आली, तेव्हा गणपत अंथरुणात नसल्याचे पाहून त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता ते सापडले नाही. नेहमीप्रमाणे खेकडे पकडायला गेले असतील असे समजून सर्वजण झोपी गेले. सकाळीसुद्धा गणपत जाधव परत न आल्याचे पाहून पत्नी पिठी जाधव हिने शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर ओढ्यामध्ये गणपत जाधवचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. याबाबत पत्नीने पोलीस पाटलांना सांगितले. पोलीस पाटलांनी माणगांव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यावेळी तातडीने माणगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे व पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी तपास सुरु केला, असता खरा प्रकार उघडकीस आला.
गणपत जाधव याचा साडू व पत्नी यांचे अनैतिक संबंध असावेत असा संशय गणपतला येत असल्याने त्यांचे नेहमी वाद होत असत. ३१ आॅक्टोबरला असाच वाद झाल्यानंतर आरोपीने बोलत बोलत त्याला घराजवळच्या ओढ्यापर्यंत नेले. त्याठिकाणी आणखी वाद झाल्यावर आरोपीने मागून कोयत्याने गणपतच्या गळ्यावर जोरदार वार केले. (वार्ताहर)

Web Title: One murdered Umbard's suspicion