खोपोलीतील अमृतांजन पुलाजवळ एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:47 IST2018-04-18T01:47:56+5:302018-04-18T01:47:56+5:30

अनैतिक संबंधातून लोणावळा मावळमधील व्यक्तीचा खून केल्याची गंभीर घटना खोपोली पोलीसस्थानक हद्दीत घडली आहे. खोपोली-बोरघाट येथे सोमवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 One murdered near Amrutanjan bridge in Khopoli | खोपोलीतील अमृतांजन पुलाजवळ एकाचा खून

खोपोलीतील अमृतांजन पुलाजवळ एकाचा खून

खालापूर : अनैतिक संबंधातून लोणावळा मावळमधील व्यक्तीचा खून केल्याची गंभीर घटना खोपोली पोलीसस्थानक हद्दीत घडली आहे. खोपोली-बोरघाट येथे सोमवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दीपक मारु ती पवार (३५, रा. सोमवडी, ता. मावळ) याचे त्याच गावातील राहणारे दिलीप ज्ञानेश्वर पवार याची पत्नी दीपाली हिच्या सोबत अनैतिक संबंध होते. दीपालीच्या पतीला हे संबंध कळल्यानंतर दीपकचा काटा काढण्याचे त्याने ठरवले. सोमवारी दीपक हा दीपालीला आपल्या बुलेट गाडीवरून खंडाळा-बोरघाट या ठिकाणी फिरण्यास घेऊन आला असताना; त्याच्यात, दीपालीचा पती दिलीप आणि त्याचा भाचा मंगेश नाथा बोडके यांच्यात वादावादी झाली. तिघांनी दीपकला अमृतांजन ब्रिजवरून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून खाली ढकलून दिले. यात गंभीर जखमी दीपकचा रु ग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची तक्रार उमेश मारु ती पवार यांनी दाखल केली.

Web Title:  One murdered near Amrutanjan bridge in Khopoli

टॅग्स :Murderखून