महाडमध्ये मगरीच्या हल्ल्यात एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:10 IST2018-10-15T23:09:58+5:302018-10-15T23:10:18+5:30
महाड : मगरीने केलेल्या हल्ल्यात एक आदिवासी जखमी होण्याची घटना सोमवारी महाड शहरानजीक घडली. पिंट्या बारकू जाधव (४०, रा. ...

महाडमध्ये मगरीच्या हल्ल्यात एक जखमी
महाड : मगरीने केलेल्या हल्ल्यात एक आदिवासी जखमी होण्याची घटना सोमवारी महाड शहरानजीक घडली. पिंट्या बारकू जाधव (४०, रा. गांधारपाले, आदिवासी वाडी) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी दुपारी गांधारी नदीपात्रात तो मासेमारी करत असताना अचानक मगरीने हल्ला करून त्याचा उजवा पाय जबड्यात पकडला. त्याने कशीबशी आपली सुटका करून घेत किनारा गाठला. त्यानंतर नागरिकांनी त्याला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायाला गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे.
महाड शहरातील सावित्री आणि गांधारी नद्यांमध्ये मगरींचे वास्तव्य आहे. वर्षागणिक मगरींच्या संख्येत वाढ होत असली तरी आजवर त्यांच्याकडून माणसांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले नव्हते. मात्र आता प्रथमच माणसावर हल्ला झाल्याने मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रु ग्णालयात जाऊन पिंट्या जाधव याची विचारपूस केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.