घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:37 IST2018-10-18T23:37:39+5:302018-10-18T23:37:42+5:30
गाडी जप्त : ढालकाठी येथे पोलीस बंदोबस्त

घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा
बिरवाडी : महाड तालुक्यातील ढालकाठी येथे घरात घुसून जमावाने मारहाण केल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरलेली गाडी महाड एमआयडीसी पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेत परस्परविरोधी तक्र ारी दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुरेश रामा आहिरे (५० रा. ढालकाठी, ता. महाड) यांनी दिलेल्या तक्र ारीनुसार, बुधवारी रात्री बंटी उर्फ विनीत अशोक चौधरी (रा. वडघर, ता. महाड), सुभाष चौधरी (रा. वडघर) व इतर २० ते २५ जण असे घरात घुसले आणि त्यांनी आहिरे आणि त्यांच्या पत्नीस शिवीगाळ व दमदाटी केली, तसेच घरातील सामानाचे नुकसान केले. आहिरे यांच्या पत्नीने अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यात त्यांचे मंगळसूत्र गहाळ झाले. जमावाने शेजाऱ्यांनाही मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिली. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय धोंडीराम चौधरी (३८, रा. वडघर, ता. महाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिरवाडी येथील बाग परिसरातील भाजी दुकानातील किरकोळ कारणाने झालेल्या वादात आहिरे यांनी दुखापत केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर ढालकाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.