पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:37 AM2020-11-30T00:37:20+5:302020-11-30T00:37:32+5:30

व्यापाऱ्यांची भूमिका, रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते.

No more lockdown, no need to follow rules; Citizens should be careful | पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

Next

अलिबाग : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्रिसूत्रीच्या नियमांचे पालन करावे. तरच जिल्ह्यात कोरोना लाट रोखण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन न करता नियम व अटी कडक करून त्याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे, असा सूर व्यापारीवर्गाकडून उमटत आहे.

रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते. यापैकी ५४ हजार २०७ कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ६०३ जणांचा आठ महिन्यांत मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ९७० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आणि थंडीचा हंगाम सुरू झाल्याने विषाणू हवेत जास्त वेळ जिवंत राहतात. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रशासन कोरोनाची लाट रोखण्यासाठी सज्ज आहे. 

रायगड, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन तयार करणारा जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जागेची पाहणी केंद्राकडून केली जाणार आहे. लवकरच जनरेशन प्लांटही कार्यान्वित केला जाणार आहे. - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक 

कोरोनावर लस येईपर्यत नागरिकांनी सुरक्षेसाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन नागरिकांनी करावे. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी 

माणगाव, कर्जत, पेण, श्रीवर्धन या ठिकाणी २ टनचा प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माणगाव येथे २०० टन ऑक्सिजनचा साठाही करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तेवढे ऑक्सिजन उपलब्ध असून १०० व्हेंटिलेटर बेडची सुविधा केलेली आहे. औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे. - आरोग्य विभाग

लाॅकडाऊन कालावधीत किराणा खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या  रांगा लागल्या होत्या. मात्र संचार व टाळेबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने नागरिकांना किराणा खरेदी करणेही अशक्य झाले होते. त्यामुळे सध्या आमचाही व्यवसाय पूर्ववत झाला नाही. - व्यापारी संघटना

काही कारखान्यांमध्ये काॅस्ट कटिंग झाल्याने कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. आता लाॅकडाऊन न करता कोरोनाबाबत खबरदारी घेऊन कामकाज सुरू राहणे गरजेचे  आहे. - कामगार संघटना

Web Title: No more lockdown, no need to follow rules; Citizens should be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.