शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

स्वच्छ शहरासाठी खोपोली नगरपालिकेचे पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:54 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालेले आहे. नागरिकांचा सक्रि य सहभाग अतिशय मोलाचा असून, पालिकेच्या कर्मचारीवर्गानेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून

खोपोली : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालेले आहे. नागरिकांचा सक्रि य सहभाग अतिशय मोलाचा असून, पालिकेच्या कर्मचारीवर्गानेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून आपले काम चोख बजावले पाहिजे. कोणतेही अभियान सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होऊ शकते. या वेळी कामगारांनी नियमित कामकाज करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवून सेवा देण्याचे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी केले.खोपोली नगरपरिषद कर्मचाºयांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. कर्जतचे मुख्याधिकारी रामदास कोकरे व खोपोलीचे मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी ३५० कर्मचाºयांना प्रशिक्षण व प्रभावी कामकाजाबाबत धडे दिले.खोपोली शहर स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत यशस्वी होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात नागरिकांचाही सहभाग वाढवून देश पातळीवरील या स्पर्धेत उच्च मानकरी होण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू आहेत. शहरात स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत असणाºया कामगारांना सकारात्मक कामासाठी मार्गदर्शन व विविध सूचना देण्यासाठी शनिवारी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, आरोग्य सभापती अलका शेंडे, मुख्याधिकारी संजय शिंदे, उप मुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.पालिकेच्या सेवेत असणारे सर्व विभागांतील अधिकारी, कामगार, मुकादम या सर्वांनी या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शपथ घेतली. तसेच स्वच्छतेप्रति नागरिकांत जागृकता व आवड निर्माण करून देण्यासाठी या शिबिरात महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.शहरात कोणत्याही भागात कचरा दिसणार नाही, गटारे तुंबलेली दिसणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यासाठी साधन सामग्रीची तत्परता नगरपालिकेकडून देण्यात येईल, असे मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नागरिकांनी केलेल्या सूचनेचे पालन करून आपली सेवा द्या, जेणेकरून या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवून, खोपोली नगरपालिका या स्पर्धेची मानकरी ठरेल, असे आवाहन शिंदे यांनी केले. उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनीही मार्गदर्शन करताना खोपोली शहराच्या प्रत्येक प्रभागात वेळेत स्वच्छता झाली पाहिजे, त्यासाठी वेळेवर कामावर हजर राहून जनतेला अपेक्षित असणारी स्वच्छता करा, अशी सूचना केली. दुसºया सत्रात कर्जतचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी त्यांचा कार्यालयीन अनुभव, सोबत सकारात्मक व नागरी सहभाग वाढविण्यासाठी विविध उपायांबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच खोपोलीस मिळत असलेला सकारात्मक पाठिंबा बघता स्वच्छता मोहिमेमध्ये खोपोली नगरपालिका जिल्ह्यात किंवा राज्यात नाही तर देशात अग्रभागी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान