राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा संपन्न
By Admin | Updated: January 9, 2017 06:30 IST2017-01-09T06:30:33+5:302017-01-09T06:30:33+5:30
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका २०१७च्या पार्श्वभूमीवर आ. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे

राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा संपन्न
कार्लेखिंड : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका २०१७च्या पार्श्वभूमीवर आ. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, ८ जानेवारीला जगन्नाथ के णी सभागृहात पोयनाड विभाग राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रकाश धुमाळ यांनी सुनील तटकरे यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी, तसेच विभागातील गरजू व्यक्ती व विद्यार्थ्यांना मोलाची मदत होऊन विकासाचे नवीन पर्व व्हावे, याकरिता आगामी पंचायत समिती उमेदवारीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राज केणी यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी धुमाळ यांनी के ली. यासाठी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल व कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत मी जातीने पोहोचवीन, अशी ग्वाही धुमाळ यांनी दिली.
या मेळाव्यात राजा केणी सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मनोज धुमाळ, हेमनाथ खरसंबळे, बच्चुशेठ पाटील, उत्तमशेठ पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच रसिका केणी, मीनाक्षी खरसंबळे, अस्मिता पाटील, रतन पाटील,प्रदीप केणी यांची व आदिवासी बांधव व महिला बहुसंख्येने उपस्थिती होत्या.