भात केंद्राने मिळविला राष्ट्रीय दर्जाचा लौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:24 IST2018-08-30T04:23:32+5:302018-08-30T04:24:22+5:30
सुरेश लाड यांचे प्रतिपादन : कर्जत भात संशोधन केंद्राचा शताब्दी वर्ष कार्यक्रम

भात केंद्राने मिळविला राष्ट्रीय दर्जाचा लौकिक
जयंत धुळप
अलिबाग : भातांच्या विविध जाती प्रसारित करणाऱ्या कर्जत भात संशोधन केंद्राने १०० व्या वर्षात पदार्पण करून, देशपातळीवर लौकिक निर्माण केल्याचा अभिमान आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारे शेती तंत्र विकसित झाले, समूह शेतीला उत्तेजन मिळाले व उचित पीक पद्धती अवलंबण्याबाबत वेळेत मार्गदर्शन मिळाले, तर शेती फायदेशीर होईल. कृषी विद्यापीठ हे शेतकºयांसाठी आधारवड आहे, असे प्रतिपादन कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी केले आहे.
कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील भात संशोधन केंद्राच्या शताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभाच्या निमित्ताने केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृह सभागृहात आयोजित कार्यक्रमात आ. लाड बोलत होते. या वेळी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर व डॉ. शंकरराव मगर, कर्जतच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विभागीय सहसंचालक डॉ. विकास पाटील, सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. अविनाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. लाड पुढे म्हणाले, भाजीपाला, फळबाग, सफेद कांदा, पर्यटन या माध्यमातून शेतकरी सक्षम होऊ शकतो. प्रयोगांतूनच शेतकºयांना प्रेरणा मिळते. यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्थांची मदत मिळविण्यासाठी पुढाकार घेऊ न कृषी समृद्धीसाठी नेटाने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी अखेरीस दिले.
‘भात’ या विषयावर सलग १०० व्या वर्षातदेखील संशोधन सुरू ठेवणे, हे कर्जत केंद्राची ऐतिहासिक कामगिरी आहे. पुढील १०० वर्षांत भातावर काय संशोधन करायला हवे, याबाबतची दिशाही विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ठरविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन या वेळी बोलताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी केले. कुलगुरू डॉ. भट्टाचार्य पुढे म्हणाले, जपान व चीन या देशांत भाताची उत्पादकता व भारतापेक्षा ती उत्पादकता कितीतरी जास्त आहे. मात्र, आपल्यासमोर भात उत्पादकता नव्हे, तर भाताला मिळणारा भाव हे खरे आव्हान असल्याचे सांगितले. भात शेती करताना यंत्रचलित क ोळपे व अधिक चागंल्या प्रकारचे पाणी व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी या वेळी नमूद केली. जागतिक तापमानवाढीसारख्या जटील समस्या उभ्या राहिल्या, तरी प्रसंगानुरूप संशोधन करण्याची क्षमता भात संशोधन केंद्रात असल्याने भात पीक येत्या काळातही निश्चित तग धरेल, असा विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.
पुस्तके व स्मरणिकेचे प्रकाशन
च्या वेळी माजी कुलगुरू डॉ. कद्रेकर, डॉ. मगर, डॉ. हळदणकर, डॉ. विकास पाटील यांनी आपले विचार मांडले. तर पाचही सत्कारमूर्ती शेतकºयांसह कृषिभूषण चंद्रशेखर भडसावळे, कृषिनिष्ठ शेतकरी कृष्णाजी कदम, प्रा. विनायक पाटील, कर्जत व खालापूर तालुक्याच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख, गजानन दळवी, प्रा. विजय देशपांडे, डॉ. नारायण जांभळे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘भात लागवड तंत्रज्ञान’, ‘आंबा, काजू व भात पिकावरील कीड व रोग नियंत्रण’ या पुस्तकासह स्मरणिका व सहा घडीपत्रिक ांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी, तर आभार प्रमुख कृषिविद्यावेता डॉ. शिवराम भगत यांनी मानले.
मान्यवर आणि शेतकºयांचा गौरव
च्याप्रसंगी माजी संशोधन संचालक डॉ. अरुण मांडोखोत, डॉ. नारायण जांभळे, डॉ. किरण कोकाटे, माजी संशोधन संचालक डॉ. डी. जी. भापकर, प्रा. व्ही. एच. पाटील, प्रा. व्ही. एन. देशपांडे, डॉ. डी. एस. सावंत, कोकण विभागातील पाच प्रगतशील शेतकरी डॉ. विलास मारुती सुराशे (खेवार-ठाणे), देवेंद्र आत्माराम राऊ त (वरोर- पालघर), लहू नामाजी चाळके (म्हसळा-रायगड), मिलिंद दिनकर वैद्य (रीड-रत्नागिरी), उत्तम भगवान परब (तळवडे-सिंधुदुर्ग) यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊ न मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.