शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

रायगडात तापले ‘नॅपकिन’ राजकारण, तटकरेंच्या नकलेला गोगावलेंचे प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:14 IST

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी महाडचे आ. भरत गोगावले यांची नॅपकिनवरून नक्कल केल्यामुळे वादंग निर्माण ...

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी महाडचे आ. भरत गोगावले यांची नॅपकिनवरून नक्कल केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. खा. तटकरे यांच्या या नक्कल करण्याला आ. गोगावले यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नॅपकिनवरून गोगावले विरुद्ध तटकरे असे राजकीय वातावरण तापले आहे.महाड येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. मेळाव्यात खा. तटकरे यांनी महाडचे आ. गोगावले यांच्यावर तोंडसुख घेतले. गोगावलेंच्या नॅपकिन वापरण्याची नक्कल करून तटकरेंनी भाषण संपवले. त्यानंतर नॅपकिन कसे ठेवायचे, कसे वापरायचे यांची ट्रेनिंग माझ्याकडून घ्या, असा टोला तटकरेंनी गोगावलेंना लगावला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.या वादामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

तुम्हाला ‘ट्रेनिंग देऊ, प्रोग्रामच ठेवू’तटकरे एवढे नकलाकार असतील, असे वाटले नव्हते. भरतशेठच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही. तटकरेंनी वेटरसारखा नॅपकिन खांद्यावर घेतला आहे. नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. खांद्यावर ठेवला तर पडतो, म्हणून काखेत ठेवतो, ही पद्धत आहे. मी काल-परवापासून नॅपकिन नाही वापरत, अनेक वर्षे वापरत आहे. तुम्हालाही सवय करायची असेल, तर ट्रेनिंग देऊ. पावसाळ्यानंतर एक प्रोग्राम ठेवू, अशा शब्दांत आ. गाेगावले यांनी खा. सुनील तटकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. 

टॅग्स :Bharat Ganeshpurayभारत गणेशपुरेsunil tatkareसुनील तटकरे