नागोठणे - रोहा एसटीला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:17 IST2018-10-15T23:17:12+5:302018-10-15T23:17:30+5:30
नागोठणे : भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने एसटीचा अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी नागोठणे-रोहा मार्गावरील आमडोशी फाट्याजवळ घडली. ...

नागोठणे - रोहा एसटीला अपघात
नागोठणे : भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने एसटीचा अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी नागोठणे-रोहा मार्गावरील आमडोशी फाट्याजवळ घडली.
नागोठणेहून रोहेकडे जाणाऱ्या एसटीवरील (एमएच १४ बी टी २३२०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. अपघातात एसटीच्या केबिनमधील सीटवर बसलेला दुर्गाप्रसाद जयस्वाल (२०, रा. रोठ खुर्द, रोहा) हा प्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अपघातात एसटीच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बसचालक समीर चंदने, रा. शेतपळस यांच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.