नगराध्यक्ष दिलीप कांबळेंचा राजीनामा
By Admin | Updated: May 10, 2017 00:23 IST2017-05-10T00:23:18+5:302017-05-10T00:23:18+5:30
नगराध्यक्ष दिलीप बाळू कांबळे यांनी सोमवारी पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्याकडे सुपूर्द केला. म्हसळा

नगराध्यक्ष दिलीप कांबळेंचा राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : नगराध्यक्ष दिलीप बाळू कांबळे यांनी सोमवारी पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्याकडे सुपूर्द केला. म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ना.मा.प्र. खुला हे असल्याने या स्पर्धेमध्ये संतोष धोंडू काते, सेजल खताते, कविता बोरकर, शीतल मांडवकर यांची नावे अग्रगण्य आहेत.
म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार सुनील तटकरे यांनी ठरल्याप्रमाणे नगराध्यक्ष पदाचा खांदेपालट करण्याचे सूतोवाच के ले. त्यामुळे कांबळे यांनी आपल्या सव्वा वर्षाच्या अल्प कालावधीत आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता म्हसळा नगर पंचायतीची कमान कोणाच्या हातात जाते याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे.