नागांव ग्रामपंचायतीचे सदस्य अनिरुद्ध राणे यांचे अकाली निधन; गावावर पसरली शोककळा
By निखिल म्हात्रे | Updated: April 14, 2024 12:39 IST2024-04-14T12:39:07+5:302024-04-14T12:39:50+5:30
शनिवारी (दि. १३) सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

नागांव ग्रामपंचायतीचे सदस्य अनिरुद्ध राणे यांचे अकाली निधन; गावावर पसरली शोककळा
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - तालुक्यातील नागांव ग्रामपंचायतीचे सदस्य अनिरुद्ध राणे यांच्या अचानक निधनाने संपूर्ण नागांवमध्ये शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभाव, साधेपणा, समाजाप्रती आपुलकी, सामाजिक कामात कायम अग्रेसर असणारा युवा कार्यकर्ता अनिरुद्ध यांनी अचानक एक्झिट घेतल्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अनिरुद्ध यांच्या अकाली निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. पुरोगामी विचारांसाठी त्यांनी काम सुरू केले होते. नागावमधील युवकांना व्यसनमुक्तीसाठी विषेश प्रयत्न करून मुख्य प्रवाहात आणण्याचे विशेष कार्य त्यांनी केले. शनिवारी (दि. १३) सायंकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.