‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर ओसरतोय; प्रशासनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 01:19 PM2020-10-18T13:19:55+5:302020-10-18T13:25:49+5:30

काेराेनाची लाट पुन्हा वाढल्यास सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने काेराेनाबाबतची लढाई ‌‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या माध्यमातून सुरूच ठेवली आहे.

My Family My Responsibility The devastation of corona is waning In Raigad district | ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर ओसरतोय; प्रशासनाला यश

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर ओसरतोय; प्रशासनाला यश

Next

आविष्कार देसाई -

रायगड :  जिल्ह्यातील काेराेनाचा कहर गेल्या काही दिवसांपासून कमी हाेताना दिसत आहे. सर्वच तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या काेराेनाचा प्रादुर्भाव सध्या मुरुड, तळा आणि सुधागड या तालुक्यांमध्ये ओसरल्याचे चित्र आहे.

काेराेनाची लाट पुन्हा वाढल्यास सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने काेराेनाबाबतची लढाई ‌‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या माध्यमातून सुरूच ठेवली आहे.

 ग्रामीण भागांमध्ये काेराेनाच्या पार्श्र्वभूमीवर विविध उपाययाेजना राबवून काेराेना विषाणूचा फैलाव हाेणार नाही. याची खबरदारी स्थानिक पातळीवर घेण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये उरण, तळाेजा, खालापूर, पेण, अलिबाग, राेहा, महाड या तालुक्यांमध्ये माेठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. या औद्याेगिक पट्ट्यांमध्ये काेरानाचा फैलाव वाढलेला पाहायला मिळत हाेता. आता त्याचा कहर कमी हाेत आहे. काेराेनाचा फैलाव वेळीच राेखण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आराेग्य विभाग, महसूल विभाग, पाेलीस यंत्रणा यांनी पावले टाकली आहेत. गावांमध्ये काेराेनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.  ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने सुदृढ आराेग्याची जबाबदारीही अंगणवाडी ताई, आशा वर्कस आणि प्राथमिक आराेग्य केंद्रावरच आहे. 

आपल्या गावात कोरोना येऊ नये यासाठी गावकऱ्यांनी घेतली ही काळजी - 

- काेराेनाला राेखण्यासाठी गावांमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तशी जनजागृती केली जात आहे.

-  दुकानामध्ये अथवा बाेलताना सामाजिक अंतर राखण्यात येत आहे. गावामध्ये सण, उत्सव साजरे न करण्यासाठी दवंडी पिटविणे.

- प्रशासनाकडून काेराेनाबाबत येणाऱ्या सूचना आदेश यांचे पालन ग्रामस्थांकडूनही होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून येते.

- बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या नाेंदी ठेवणे, गावांमध्ये स्वच्छता ठेवणे, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी औषधांचे वाटप करण्यात येत आहे.

- शेतीचा हंगाम सुरू असल्याने बी-बियाणे, अवजारे खरेदी करताना दुकानाबाहेर साेशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहे.

Web Title: My Family My Responsibility The devastation of corona is waning In Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.