शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये नगरपरिषदेची अतिक्र मण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:45 IST

पोलीस फौजफाट्यासह सुरू केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील नागरिकांनी मात्र कारवाईचे स्वागत केले आहे.

महाड : शहरात नगरपरिषदेची अतिक्रमण विरोधी मोहीम मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. पोलीस फौजफाट्यासह सुरू केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील नागरिकांनी मात्र कारवाईचे स्वागत केले आहे.पिंपळपार येथून सकाळी १० वाजता बाजारपेठ मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरु वात केली. नगरपरिषद मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर अभियंता सुहास कांबळे तसेच नगरपरिषदेचे सुमारे चाळीसहून अधिक कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. तर पोलीस उपनिरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी अतिक्र मणे काढताना व्यापाऱ्यांनी हरकत घेत विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता अतिक्र मणे हटवण्यात येत होती. दोन जेसीबी, कटर्स, चार डम्पर आदी यंत्रणा मोहिमेत कार्यरत होती.अतिक्रमण हटवण्याची मोहीम १३ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असली तरी त्यानंतर आणखी दोन दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहर स्वच्छता अभियानामध्ये महाड नगरपरिषदेने गतवर्षी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अव्वल मानांकन मिळवले असल्याने यंदाच्या स्वच्छता अभियान स्पर्धेत देखील महाड नगरपरिषदेने राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थानी राहण्याचा संकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात अतिक्रमणांमुळे आलेला बकालपणा, तसेच मुख्य मार्गांवर नियमितपणे होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी नगरपरिषदेने ही अतिक्र मण हटावची धडक मोहीम हाती घेतली आहे.आ. भरत गोगावले यांची बैठकमहाड शहरातील अनधिकृत व अतिक्र मण झालेली बांधकामे हटवण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या निर्णयाला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देत कोणत्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना आमदार भरत गोगावले यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीमध्ये दिल्या आहेत.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण